World Art Day : जगभरात आज वर्ल्ड आर्ट डे साजरा केला जातोय. जगप्रसिध्द चित्रकार, कलाकार लिओ नार्डो दा व्हिन्सी याच्या जन्मदिनानिमित्ताने 15 एप्रिल हा दिवस वर्ल्ड आर्ट डे म्हणून साजरा केला जातोय. 2011 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली. जगातील विविध कलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जातोय. जगातील अनेक लोक असे आहेत की ज्यांना कोणत्या ना कोणत्या कलेमध्ये रूची असते आणि त्याचं त्यांना प्रदर्शन करावं लागतंय. या खास दिवसाच्या निमित्ताने ते एकमेकांना जागरूकही करतात. लोकांमध्ये असणाऱ्या विविध कलांना वाव देणं, त्याला प्रोत्साहन देणं हे हा दिवस  साजरा करण्यामागचा उद्देश आहे. 


जगभरात आजच्या दिवशी अनेक ठिकाणी विविध कलांचे प्रदर्शन मांडण्यात येतंय. तसेच विविध सेमिनार्स आणि कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. कला प्रेमी आजचा दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करतात. युनेस्कोच्या वतीने आजच्या दिवशी विविध कार्यशाळा, वाद-विवाद कार्यक्रम आणि प्रदर्शन भरवले जाते आणि त्यामध्ये लोकांनी भाग घ्यावा असं आवाहन केलं जातं. या वर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे वर्ल्ड आर्ट डे साजरा करण्यावर मोठी बंधनं आली आहेत. 


 




कलेशी संबंधित अनेक मुद्द्यावर आजच्या दिवसाचे औचित्य साधून चर्चा केली जाते. त्यामध्ये जगभरात कलेचा प्रसार कसा करायचा, खासकरून मागास देशांत कलेला प्रोत्साहन कसं द्यायचं, त्यासाठी फंडिंग कसं करायचं हे सर्व पाहिलं जातं. कलेच्या माध्यमातून जगभरात सकारात्मता आणि आनंद कसा पसरायचा याचा विचार केला जातो. 


महत्वाच्या बातम्या :