iPhone SE 3 2022 : अ‍ॅपल (Apple) कंपनी नव्या वर्षात आयफोन एसई 3 (iPhone SE 3) बाजारात आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Apple ने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र लीकर्स आणि तज्ज्ञांकडून आयफोन इसई 3 बाबत माहिती देण्यात आली असून त्यामधील फीचर्सबद्दल बरेच काही सांगितले आहे. इंटरनेटवर iPhone SE 3 बर्‍याच काळापासून चर्चेत आहे. याचे नाव 'आयफोन एसई 2022' (iPhone SE 2022) असण्याची अपेक्षा आहे. हा आयफोन कॉम्पॅक्ट आयफोनचा सर्वात मोठा अॅडॉन 5G कनेक्टिव्हिटी वर्जन असणार आहे.


iPhone SE 2022 हा नवीन आयफोन iPhone SE 3 किंवा iPhone SE 5G iPhone SE 2020 मध्येच अपडेट होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की जे ग्राहक अजूनही सध्याच्या iPhone SE आणि जुन्या iPhone 6 मॉडेलच्या कॉम्पॅक्ट डिझाईनला प्राधान्य देतात त्यांच्याकडे समान आकाराचा नवीन iPhone खरेदी करण्याचा दुसरा पर्याय असेल.



  • नव्या iPhone SE ला iPhone SE 2022, किंवा iPhone SE 5G, किंवा iPhone SE 3 म्हटले जाऊ शकते.

  • यामध्ये iPhone 13 मधील 5G​ चिप हे सर्वात महत्त्वाचे अपग्रेड अपेक्षित आहे. Apple या फोनमध्ये iPhone 13 वरून A15 Bionic चिप देऊ शकते, जे 5G कनेक्टिव्हिटी आणि काही समान पातळीचे फीचर्स देईल.

  • 5G चिप एक नवीन आणि जोडलेली अपग्रेड असेल, तर बाकीचे फीचर्स आधीच्या iPhone SE प्रमाणेच समान राहण्याची शक्यता आहे. यामध्ये तुम्हांला टच आयडी फिंगरप्रिंट स्कॅनरसह 4.7-इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.

  • यामधील 4.7-इंचाचा डिस्प्लेमध्ये ट्रू टोन तंत्रज्ञानासह IPS LCD पॅनेल टिकवून ठेवण्याची शक्यता आहे. डिस्प्लेच्या आसपास जाड बेझल्स अपेक्षित आहेत.

  • iPhone SE 2022 इतर महाग आयफोन मॉडेल्सप्रमाणे फेस आयडी प्रणालीचा अवलंब करण्याऐवजी टच आयडी प्रणालीचा वापर करु शकतो.

  • Apple कॅमेरा सेन्सर कायम ठेवण्याची अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही 12MP प्रायमरी रियर कॅमेरा आणि 7MP फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

  • नवीन iPhone SE मध्ये जुनी बॅटरी आणि लाइटनिंग पोर्ट कायम राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, या आयफोनसह इन-बॉक्स चार्जर दिले जाणार नाही.

  • iPhone SE 2022 च्या इतर फीचर्समध्ये IP67 पाणी आणि धूळ प्रतिरोध, वायरलेस चार्जिंग, स्टिरीओ स्पीकर आणि सहा वर्षांपर्यंतच्या iOS अपडेट मिळण्याची शक्यता आहे.


नवीन आयफोन एसई 3 बाबतची वरील सर्व माहिती लीकर्सचे अहवाल आणि अफवांवर आधारित आहेत आणि Apple कंपनीने कोणत्याही माहितीची पुष्टी केलेली नाही.


इतर बातम्या :


Paytm कडून किफायतीशीर मोबाइल रिचार्जेसची सुविधा, ऑनलाईन रिचार्ज केल्यास मिळणार ऑफर


तुम्हाला नंबरचा चष्मा आहे? नंबर कमी करण्याचे 'हे' उपाय करुन बघा


Omicron in India : ओमायक्रॉन फोफावतोय; देशातील 19 राज्यांत 578 रुग्ण, महाराष्ट्राची परिस्थिती काय?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha