Dual-Mode Bus And Rail Vehicle : साधारणपणे रस्त्यांवर बस आणि लोहमार्गावर रेल्वे धावते, हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण, रेल्वे रुळावर बस धावतेय, असे कोणी सांगितले तर विश्वास बसणे कठीण आहे. पण हे सत्य आहे. जपानमध्ये जगातील पहिली ड्युअल मोड व्हेइकल सर्व्हिस सुरू झाली आहे. यामध्ये एक बस रेल्वे रुळावर धावते आणि रस्त्यांवरही धावते. जपानमध्ये DMV सेवा सुरू करण्यात आली आहे.


ही DMV एका मिनीबस सारखी दिसते. रस्त्यावर सामान्यपणे रबराच्या चाकांवर धावते. मात्र, रेल्वे रुळावर चालवण्यासाठी या DMV चे टायर इंटरचेंज केले जातात. त्यावेळी स्टीलची चाके ही रेल्वे रुळावर येतात आणि त्यानंतर ही बस रेल्वे म्हणून धावते. 


DMV रेल्वे रुळावर धावते तेव्हा स्टीलच्या चाकांवर सगळा भार येतो. तर DMV च्या मागील भागातील रबरी टायरसह स्टीलचे व्हेइकलवर धावते. 


 






सध्या DMV ही Asa Coast Railway कंपनीकडून चालवण्यात येत आहे. DMV ही कमी घनतेची लोकसंख्या असलेल्या कायो सारख्या शहरात फायदेशीर ठरू शकते. या लहान शहरांमध्ये स्थानिक परिवहन कंपन्यांना नफ्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. DMV रेल्वे रुळावर 21 प्रवाशांसह  60 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावू शकते. तर, रस्त्यावर 100 किमी प्रति तास या वेगाने  DMV धावू शकते. 


DMV साठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. DMV चा आकार, रेल्वे मार्गावर चालवण्यासाठी त्याची रचना आदी विविध बाबींवर संशोधन करण्यात आले. DMV साठी रेल्वे प्लॅटफॉर्ममध्येही बदल करण्यात आले. सध्या असलेले रेल्वे प्लॅटफॉर्म उंच होते. त्यामुळे  DMV च्या आकारानुसार नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यात आले.  

  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha