एक्स्प्लोर

Coronavirus | प्राण्यांमधूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचा WHO चा अहवाल

जगातील कोरोनाबाधित रुग्ण पहिल्यांदा चीनच्या वुहानमध्येच डिसेंबर 2019 मध्ये सापडला होता. यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी वुहानमधल्या बायो लॅबमधून कोरोनाव्हायरसचा प्रसार झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

Coronavirus : कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अवघं जग अडकलं आहे. भारतात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना व्हायरसचा फैलावा सुरु झाला. कोरोना व्हायरसची सुरुवात वुहान येथील प्रयोगशाळेतून झाली असं बोललं जात होतं. मात्र WHO ने स्वत: हे आरोप फेटाळले आहेत. वुहानच्या लॅबमधून नव्हे, तर प्राण्यांपासूनच मानवाला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज डब्लूएचओने आपल्या अहवालात नमूद केला आहे. एपी या वृत्तसंस्थेच्या हाती लागलेल्या अहवालात या बाबी उघड झाल्या आहेत. 

कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीचं कारण शोधण्यासाठी डब्ल्यूएचओमधील काही अधिकारी वुहान शहरात गेले होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटलं की, कोरोना वटवाघळांकडून इतर प्राण्यांमध्ये संक्रमित झाला आणि त्यानंतर त्याची मानवाला लागण होऊन तो जगभर पसरल्याची शक्यता आहे.

अहवालात संशोधकांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याचे काही सिनेरियो सांगितले आहेत. त्यांनी अहवाल असा निष्कर्ष काढला की हा विषाणू वटवाघळांपासून दुसर्‍या प्राण्यांमार्फत मानवांमध्ये पसरला. वटवाघळांपासून मानवांमध्ये व्हायरस पसरण्याची शक्यता फार कमी आहे. यासह, व्हायरस "कोल्ड-चेन" खाद्यपदार्थाद्वारे पसरू शकतो, परंतु याची शक्यता कमीच आहे. 

अहवाल प्रसिद्ध होण्यास उशीर झाल्याने प्रश्न उपस्थित

विशेष म्हणजे हा अहवाल प्रसिद्ध होण्यास विलंब झाला आहे. यामुळे कोरोनाच्या फैलावाच्या दोषातून चीनला वाचवण्यासाठी कोणतेही निष्कर्ष बदलण्याचा प्रयत्न केला होता का? असा प्रश्न निर्माण होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने गेल्या आठवड्यात सांगितले होतं की, पुढील काही दिवसांत हा अहवाल प्रसिद्ध होईल अशी त्यांना आशा आहे. एपी या वृत्तसंस्थेला WHO चे सदस्य देश असलेल्या जिनेव्हा स्थित एका अधिकाऱ्यांपासून अहवालाचा ड्राफ्ट मिळाला. दरम्यान, नेमका हाच अहवाल अंतिम स्वरुपाचा असून तोच जाहीर केला जाईल की नाही याबाबद अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पत्रकार परिषदेत सिंघुआ विद्यापीठातील चिनी वैज्ञानिक लियांग वानियान म्हणाले होते की, "SARS-CoV-2 वटवाघुळ आणि खवल्या मांजरांमध्ये आढळतो. कदाचित कोरोना विषाणूच्या संसर्गाचं कारण हेच असू शकतात कारण कोरोना व्हायरस आणि SARS मध्ये साम्य आहे. मात्र या प्रजातींमध्ये अद्याप SARS-CoV-2 चा प्रत्यक्ष संबंध आढळलेला नाही.आमचे प्राथमिक निष्कर्ष सांगतात की, एका इंटरमेडिएट होस्ट प्रजातीच्या माध्यमातून विषाणूचा फैलाव झाल्याची शक्यता सर्वाधिक आहे. हे सिद्ध करण्यासाठी अधिक अभ्यास आणि अधिक ठराविक संशोधनाची आवश्यक आहे. निष्कर्षानुसार, प्रयोगशाळेतून कोरोना विषाणाचा प्रसार झाल्याची दावा योग्य नाही.

वुहानमध्ये सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण

जगातील कोरोनाबाधित रुग्ण पहिल्यांदा चीनच्या वुहानमध्येच डिसेंबर 2019 मध्ये सापडला होता. यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी वुहानमधल्या बायो लॅबमधून कोरोनाव्हायरसचा प्रसार झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. याशिवाय चीनच्या वेट मार्केटमधूनही कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याचं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Israel Election 2026 :इस्रायल सत्तासंग्राम: 'नेतान्याहू विरोधकांची आघाडी की पुन्हा राजकीय पेच? इस्रायलमध्ये नव्या समीकरणांची नांदी
इस्रायल सत्तासंग्राम: 'नेतान्याहू विरोधकांची आघाडी की पुन्हा राजकीय पेच? इस्रायलमध्ये नव्या समीकरणांची नांदी
Israel Elections 2026: निवडणुकीच्या दिवशी इस्रायल रेल्वेसह मोफत प्रवास; मतपत्रिकांवर कशी पार पडते इस्रायलची निवडणूक? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
निवडणुकीच्या दिवशी इस्रायल रेल्वेसह मोफत प्रवास; मतपत्रिकांवर कशी पार पडते इस्रायलची निवडणूक? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Europe Protests : युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका! लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार
युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका! लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार
US Voter List Glitch : भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली
भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Raj Thackeray Karjat: राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Embed widget