World Health Organization : सध्या जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आता  जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलासादायक बातमी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनावरील उपचारासाठी दोन नवीन औषधांना मंजुरी दिली आहे. मंजुरी दिलेली दोन्ही औषधे उपचारासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानंतरच जागतिक आरोग्य संघटनेने ही औषधे वापरण्यास परवानगी दिली आहे.



गंभीर किंवा अती गंभीर कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी कॉर्टिकोस्टिरॉईड्ससह वापरल्या जाणाऱ्या बॅरिसिटिनिब औषधामुळे मृत्यूदर कमी होतोय. शिवाय रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज देखील कमी लागतेय, असे ब्रिटीश मेडिकल जर्नल द बीएमजे मधील शिफारसीमध्ये WHO च्या तज्ञांनी म्हटले आहे. तसेच तज्ज्ञांनी सिंथेटिक अँटीबॉडी उपचार सोट्रोविमॅबची शिफारस देखील केली आहे. कोरोना नसलेल्या परंतु हॉस्पिटलायझेशनचा सर्वाधिक धोका असलेल्यांसाठी या औषधांची शिफारस केली आहे. यामध्ये वृद्ध, इम्युनोडेफिशियन्सी असलेले लोक किंवा मधुमेहासारखे आजार असलेल्या लोकांचा समावेश आहे. रूग्णालयात दाखल होण्याचा धोका नसलेल्या लोकांसाठी सोट्रोविमॅबचे फायदे क्षुल्लक मानले गेलेत. तर WHO ने देखील ओमायक्रॉनसारख्या नवीन व्हेरिएंटविरोधात त्याची प्रभावीता अजूनही अनिश्चित असल्याचे म्हटले आहे. 


संधिवाताचे औषध बॅरिसिटिनिब, कॉर्टिकोस्टिरॉईड्स या दोन्ही औषधांचा वापर गंभीर कोरोना रूग्णांवर उपचारासाठी करण्यात आला. त्यामुळे रुग्णांचे जगण्याचे प्रमाण वाढले आणि व्हेंटिलेटरची आवश्यकताही कमी झाली. तज्ज्ञांनी कमी गंभीर कोविड रुग्णांसाठी सिंथेटिक अँटीबॉडी सोट्रोविमॅबची शिफारस देखील केली आहे. ज्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा धोका जास्त आहे. त्यांच्यासाठी हे प्रभावी आहे. 


कॉर्टिकोस्टिरॉइड्स स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि सामान्यतः गंभीर रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरतेय. याशिवाय Tocilizumab आणि Sarilumab औषधांना WHO ने जुलैमध्ये मान्यता दिली आहे.  सप्टेंबर 2020 पासून, WHO ने गंभीर आजारी रूग्णांसाठी कॉर्टिकोस्टिरॉईड्ससह फक्त चार औषधांना मान्यता दिली आहे. कॉर्टिकोस्टिरॉईड्स स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. टोसिलिझुमॅब आणि सेरिलुमॅब ही संधिरोग औषधे, ज्यांना जुलैमध्ये WHO ने मान्यता दिली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला डब्ल्यूएचओने सिंथेटिक अँटीबॉडी उपचार रेजेनेरॉनला देखील मान्यता दिली होती.