Omicron Variant : गेल्या दोन-तीन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. अजूनही कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेलं नाही. तोपर्यंतच जागतिक आरोग्य संस्थचे (World Health Organisation) प्रमुख टेड्रोस अॅधानोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सांगितले की, सध्याचा काळ हा कोरोना संक्रमणासाठी अधिक पोषक आहे. या काळात नवीन व्हायरसचा प्रसार होऊ शकतो. 


टेड्रोस अॅधानोम घेब्रेयसस म्हणाले, जगातील सर्व देशांनी कोरोना व्हायरसला हरवायचं मनात आणलं तर ही गोष्ट शक्य आहे. सध्याच्या काळात संपूर्ण जगाचे लक्ष फक्त कोरोना महामारी संपवण्याकडे पाहिजे. कोरोनाचा हा विषाणू स्फोटासारखा पसरला आहे. काही वेळाने तो कमी झाला आणि पुन्हा कोरोनाचा स्फोट झाला.  


"काही देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण चांगल्या प्रकारे झाले आहे. त्यामुळे कोरोना महामारीचे संकट कमी झाले आहे. परंतु, एका आठवड्यात 70 लोक लोक मरत आहेत. शिवाय  आफ्रिकेतील 83 टक्के लोकसंख्येला अद्याप लसीचा एक डोस मिळालेला नाही. कोरोना हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू  आहे. परंतु, कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंच शोधण्यासाठी आमच्याकडे पुरेशी साधणे नाहीत, अशी माहिती टेड्रोस अॅधानोम घेब्रेयसस यांनी दिली.   


डॉ. घेब्रेयसस यांनी म्हटले की, सध्याची परिस्थिती खूप गंभीर नाही. या महामारीला रोखणे शक्य आहे. आम्ही सर्व देशांना लस, चाचण्या, उपचार आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे सर्वत्र उपलब्ध करून देण्यासाठी ACT एक्सीलरेटरसाठी 16 अब्ज निधीची तफावत त्वरित भरून काढण्याचे आवाहन करत आहोत.


महत्वाच्या बातम्या