Zombie Drug : जगभरात अंमली पदार्थांचा वापर वाढत असल्याचं दिसत आहे. अंमली पदार्थ सेवन आणि तस्करी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध देशांकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. मात्र, याचा कोणताही उपयोग होताना दिसत नाहीय. आता तर एका देशामुळे अंमली पदार्थामुळे आणीबाणी लागू करण्याची वेळ आली आहे. नशेसाठी लोक कबरीतील मृतदेह खोदून काढत आहेत. झॉम्बी ड्रगमुळे (Zombie Drug) पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन या देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.


नशेसाठी कबरीमधून हाडांची चोरी


पश्चिम आफ्रिकेतील देश देश सिएरा लिओनमध्ये मोठं संकट ओढवलं आहे. सिएरा लिओन देशात अनेक लोकांना झॉम्बी ड्रगचं व्यसन लागलं आहे. या ड्रगसाठी लोक लोक कबरीतील मृतदेह खोदून काढत असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. येथील लोकांना मानवी हाडांपासून बनवलेल्या झॉम्बी ड्रग या सायकोॲक्टिव्ह ड्रग्सचं व्यसन लागलं आहे, त्यामुळे लोक कबर खोदून मृतदेह बाहेर काढून हाडांची चोरी आहेत. या भयंकर धोक्याचा सामना करण्यासाठी सिएरा लिओनचे अध्यक्ष ज्युलियस माडा बायो यांनी देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.


झॉम्बी ड्रगमुळे सिएरा लिओन देशात आणीबाणी लागू


राष्ट्राध्यक्ष ज्युलियस माडा बायो यांना झॉम्बी ड्रगमुळे देशात आणीबाणी लागू केली आहे. लोकांना या ड्रगचं इतकं वाईट व्यसन लागलं आहे की, नशेबाज झॉम्बी ड्रग बनवण्यासाठी कबर खोदत आहेत. सिएरा लिओनमधील लोकांना या झॉम्बी ड्रगचं व्यसन लागलं आहे. यामुळे अनेक लोकांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं आहे. रूग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी 63 टक्के रुग्णांना या झॉम्बी ड्रगचं व्यसन लागलं आहे. 


स्पेशल टास्क फोर्सही तयार


सिएरा लियोन देशातील लोक या कुश ड्रगच्या आहारी गेले आहे. याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून लोक अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडत आहेत. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे अनेकांच्या शरीरावर सुज आली आहे. अनेक लोकांना या व्यसनापासून मुक्तता हवी आहे. हा व्यसनापासून मुक्तता मिळवण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सही तयार करण्यात आली आहे. झॉम्बी ड्रग्स बनवण्यासाठी लोक कबरी खोदत आहेत, हे थांबवण्यासाठी स्मशानभूमींचं संरक्षण करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. 


काय आहे झॉम्बी ड्रग?


झॉम्बी ड्रग यालाचं कुश असंही म्हटलं जातं. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, कुश ड्रग हे विविध प्रकारच्या विषारी पदार्थांचे मिश्रण करुन तयार केला जाणारा अंमली पदार्थ आहे. यामध्ये मानवी हाडे हा महत्त्वाचा भाग आहे. मुखत्वे मानवी हाडांचा वापर करुन हा कुश ड्रग म्हणजेच झॉम्बी ड्रग तयार केला जातो.


काय आहे हा ड्रग?


झॉम्बी ड्रगचं  नाव झायलाजीन (Xylazine) असं आहे. झॉम्बी ड्रग या औषधाचा वापर हा जनावरांसाठी केला जातो. जनावरांना बेशुद्ध करण्यासाठी याचा वापर केला जातो. मात्र, ब्लॅक मार्केटमधून याची विक्री अमली पदार्थाच्या रुपात केली जाते. झॉम्बी ड्रग स्वस्त असल्याने नशेबाज याचं सेवन करतात. ड्रग तस्करही झॉम्बी ड्रग इतर ड्रग्समध्ये मिसळून भेसळ करत असल्याचंही काही रिपोर्टमुळे समोर आलं आहे.


झॉम्बी ड्रगचा शरीरावर काय परिणाम होतो?


झॉम्बी ड्रगच्या सेवनानंतर व्यक्ती शुद्धीत राहत नाही. याच्या सेवनानंतर माणूस झॉम्बीप्रमाणे वागू लागतो. त्याच्या शरीराची हालचाल मंदावते, काय करतोय याचं भान राहत नाही. याच्या अतिसेवनामुळे त्वचेवर जखमा होतात आणि यामुळे जखमा होऊन त्वचा सडू लागते. याचा परिणाम इतका घातक आहे की, बाधित व्यक्तीचा अवयव कापण्याचीही वेळ येऊ शकते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Zombie Pigeons : कबूतर बनतायत 'झॉम्बी', कारण ठरतोय नवा धोकादायक विषाणू