Pigeon Paramyxovirus : कबूतरांना ( Pigeon ) नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत आहे. या विषाणूची लागण झाल्यावर कबूतर 'झॉम्बी' ( Zombie ) बनत असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कबूतरांवर पॅरामिक्सोव्हायरस ( PPMV - Pigeon Paramyxovirus ) या रोगाचं संकट कोसळलं आहे. या रोगाची लागण झाल्यावर कबूतर एखाद्या झॉम्बीप्रमाणे वागू लागतं, म्हणून काही नेटकऱ्यांनी या कबूतरांचा 'झॉम्बी कबूतर' असा उल्लेख करत आहेत. कबूतरांवरील हा नवा आजार ब्रिटनमध्ये पसरल्याचं अनेक मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. या विषाणूची लागण झाल्यावर कबूतराचं मेंदूवर संतुलन राहत नाही, यामुळे त्याला मानेचा तोल सांभाळणं कठीण होतं, शिवाय कबूतराची उडण्याची क्षमताही निघून जाते.
मीडिया रिपोर्टनुसार, पिजन पॅरामिक्सोव्हायरसला ( Pigeon Paramyxovirus ) PPMV किंवा न्यूकॅसल रोग ( Newcastle Disease ) म्हणजे पक्षांमध्ये पसरणारा संसर्गजन्य आजार असेही म्हणतात. या रोगाची लक्षणे कबूतराचं मानेवर नियंत्रण नसणे आणि उडण्याची शक्ती नसणे, तसेच पंख आणि पाय थरथर कापणे, ही आहेत. सध्या ब्रिटनमधील कबूतरांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत आहे. यासह न्यू जर्सीमध्ये या विषाणूची लागण झाल्याने काही कबूतरांचा मृत्यू झाला आहे. सध्या या विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नाही.
ब्रिटनमधील कबूतरांना पॅरामिक्सोव्हायरसची लागण
ब्रिटनमध्ये कबूतरांना पॅरामिक्सोव्हायरस (PPMV) या रोगाची लागण झाली आहे. यामुळे ब्रिटनमधील कबूतरांचा जीव धोक्यात आहे. हा एक न्यूरोलॉजिकल आजार असून याची लागण झालेल्या कबूतरांमध्ये मान फिरणे, पंख थरथरणे अशी लक्षणे दिसतात. या आजाराची लागण झालेल्या कबुतराला हालचाल करता किंवा उडता येत नाही. या आजाराची लागण झालेल्या कबूतरांना हिरव्या रंगाची विष्ठा होते. हा रोग कबुतरांवरील अतिशय घातक आजार आहे.
झॉम्बी कबूतराचा व्हायरल व्हिडीओ येथे : पाहा
मज्जासंस्थेवर परिणाम करतो पिजन पॅरामिक्सोव्हायरस
हा आजार कबुतरांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो, त्यामुळे कबुतराला हालचाल करता येत नाही, तसेच कबुतराला उडताही येत नाही. यामुळे कबुतराची मान फिरते, तर हवेत उडता उडता जमिनीवर कोसळल्याचंही पाहायला मिळत आहे. कबुतरांवरील हा आजार अत्यंत प्राणघातक आहे. सध्या या आजाराने ब्रिटनमधील कबुतरांना लक्ष्य केलं आहे. माणसाला या आजाराची लागण होऊ शकत नाही. हा पक्ष्यांमधील आजार आहे.
पिजन पॅरामिक्सोव्हायरस काय आहे? ( What is Pigeon Paramyxovirus )
- पिजन पॅरामिक्सोव्हायरस ( Pigeon Paramyxovirus ) हा मज्जासंस्थेचा आजार ( Neurological ) आहे.
- हा पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने कबूतरांमध्ये पसरणारा आजार आहे.
- या रोगाला PPMV किंवा न्यूकॅसल रोग असेही म्हणतात.
- माणसाला या आजाराचा धोका नाही.
- 2011 साली ऑस्ट्रेलियामध्ये हा आजार आढळून आला होता.
- हा आजार मज्जासंस्थेवर म्हणजेच मेंदूवर परिणाम करत असल्याने कबूतराचा शरीराचा तोल सांभाळणे कठीण होते.
- कबूतराचं मानेवर आणि शरीरावर संतुलन राहत नाही, त्यामुळे कबूतरांना उडता येत नाही.
- तसेच या आजाराची लागण झालेलं कबूतर मान फिरलेल्या अवस्थेत गोल-गोल चक्कर काढताना पाहायला मिळतं.
- सध्या या आजारावर लस उपलब्ध नाही.