Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला तणाव अखेर गुरुवारी युद्धात बदलला. युक्रेन-रशिया तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला का केला ते जाणून घेऊया.


1. रशिया आणि युक्रेनमधील वादाचे मूळ नाटो आहे. NATO म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची सुरुवात 1949 मध्ये झाली. रशियासाठी नेहमीच समस्या असलेल्या युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचे आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास नाटो देशांचे सैन्य आणि तळ त्याच्या सीमेजवळ येतील, असे रशियाला वाटते.


2. व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे की, युक्रेन आता सार्वभौम देश नसून पाश्चात्य देशांची कठपुतली आहे.


3. रशियाने युक्रेनला नाटोचे सदस्यत्व स्वीकारणार नाही याची पुष्टी करण्यास सांगितले आहे. तसेच स्वत:चे नि:शस्त्रीकरण करेल आणि एक तटस्थ राष्ट्र म्हणून काम करेल, याचीही पुष्टी करण्यास सांगितले आहे.


4. माजी सोव्हिएत प्रजासत्ताक म्हणून, युक्रेनचे रशियाशी खोल सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. हेच कारण आहे की युक्रेनमध्ये रशियन भाषा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मात्र 2014 मध्ये रशियाने केलेल्या आक्रमणानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. आता याचे रूपांतर युद्धात झाले आहे.


5. 2014 मध्ये युक्रेनच्या रशिया समर्थक राष्ट्राध्यक्षांची हकालपट्टी झाली तेव्हा रशियाने युक्रेनवर शेवटचा हल्ला केला होता. तेव्हापासून पूर्व युक्रेनमधील बंडखोरीच्या घटनांमध्ये 14000 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे, असे म्हटले जाते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha