एक्स्प्लोर

Walmart : वॉलमार्ट कंपनी 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून हटवणार

Walmart : वॉलमार्ट कंपनी सुमारे 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून हटवणार आहे. वॉलमार्ट कंपनीने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार कंपनी सुमारे 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून हटवणार आहे.

Walmart : वॉलमार्ट कंपनी (Walmart) सुमारे 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून हटवणार आहे. वॉलमार्ट कंपनीने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार कंपनी सुमारे 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून हटवणार आहे. अमेरिकेतील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता असलेल्या वॉलमार्ट कंपनीने बुधवारी ही माहिती दिली आहे. वॉलमार्ट कंपनी अटलांटातील जॉर्जिया येथील फुल्टन पार्कवेमध्ये असणाऱ्या ऑफिसमधून सुमारे 1500 कामगारांना कमी करणार आहे. वॉलमार्ट कंपनीने कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये याबाबत माहिती दिली आहे. 

वॉलमार्टचे प्रवक्ते स्कॉट पोप यांनी सांगितलं की, 'वाढत्या ऑनलाईन वॉलमार्ट फुलफिलमेंट सर्व्हिसेस (WFS) व्यवसायाला पाठिंबा देण्यासाठी फुल्टन पार्कवेवरील ऑफीसमध्ये बदल करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून इमारतीतील सोयीसुविधा लक्षात घेता त्या पूर्ण करण्यासाठी अधिक जागा लागेल. या गरजा पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा, प्रक्रिया, कर्मचारी आवश्यकता याबाबत कंपनी गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे कंपनी या ऑफीसमधील सुमारे 1500 कर्मचारी कमी करण्याच्या तयारीत आहे.'

अमेरिकेतील कामगार कायद्याद्वारे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याआधी पूर्वसूचना देणे आहे. कोणतीही कंपनी 100 किंवा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून हटवणार असेल. तर त्याआधी 60 दिवस कंपनीने कर्मचाऱ्यांना आगाऊ सूचना देणे आवश्यक आहे. वॉलमार्ट कंपनीने या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आगाऊ सूचना दिली आहे. कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या मध्यात याबाबत माहिती देण्यात आली होती.

वॉलमार्ट कंपनी आता आधुनिकीकरणावर भर देत आहे. अटलांटा येथील वॉलमार्ट कंपनीच्या इमारतीचं रुपांतर मोठ्या वेअरहाऊसमध्ये करण्यात येणार आहे. ऑनलाइन व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी हा बदल आवश्यक असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. इमारतीमधील ऑफीसचं रुपांतर गोडाऊनमध्ये केल्यावर ऑफीससाठी कमी जागा ठेवण्यात येईल. परिणामी इमारतीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी लागेल. त्यामुळे कंपनी सुमारे 1500 कर्मचाऱ्यांना हटवणार आहे. 

वॉलमार्ट कंपनी जॉर्जिया राज्यात 70,000 हून अधिक कामगारांना रोजगाराची संधी देते. वॉलमार्ट सध्या वॉलमार्ट फुलफिलमेंट सर्व्हिसेस (WFS) द्वारे पूर्णपणे ऑनलाईन कामकाजासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे कंपनी मनुष्यबळ कमी करत आहे. वॉलमार्टचे प्रवक्ते स्कॉट पोप यांनी सांगितलं की, 'कंपनी कर्मचाऱ्यांना नवीन नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही कर्मचार्‍यांना इतर वॉलमार्ट स्टोअर आणि भागींदारांमार्फत नोकरीची संधी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Bangladesh Violence : बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget