Viral Video :  डेबिट कार्ड (Debit card) किंवा क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर  अनेकजण करतात.  एटीएम मशिनमधून पैसे चोरी केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील.  एका व्याक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो व्यक्ती एटीएम मशिन फोडतोय, असं दिसतंय. अनेकांना वाटलं असेल की, या व्यक्तीने एटीएम मशिन फोडून मशिनमध्ये असणारे पैसे चोरले. पण तसं त्या व्यक्तीने केले नाही. जाणून घेऊयात त्या व्यक्तीने एटीएम मशिनमधून पैशाऐवजी कोणती गोष्ट बाहेर काढली.    


पैसे नाही तर स्वत:च डेबिट कार्ड घेतलं, नेटकऱ्यांनी कौतुक केलं


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, तो व्यक्ती सुरूवातीला एटीएम मशिन तोडण्याचा प्रयत्न करतो. ते पाहून आपल्याला असं वाटू शकते की तो चोर आहे आणि मशिन तोडून तो त्यामधील पैसे चोरेल. पण तसे होत नाही. एटीएम मशिनची स्क्रिन मशिनमधून बाहेर काढल्यानंतर मशिनच्या आत तो पाहतो. नंतर तो  मशिनमध्ये अडकलेले डेबिट कार्ड काढतो. व्हिडीओच्या शेवटी त्या व्यक्तीने सीसीटिव्ही कॅमेऱ्याकडे पाहून हटके रिअॅक्शन दिली आहे. व्हिडीओवर सर्वात प्रामाणिक माणून असं लिहिलं दिसत आहे. 
 


व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओला आत्तापर्यंत 1 कोटी 92 लाख लोकांनी पाहिले आहे. तसेच या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स देखील केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'दिल जीत लिया'. अनेकांनी व्हिडीओमधील व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे. 


संबंधित बातम्या : 


Viral Video : आईचं स्वागत करायला एअरपोर्टवर गेला मुलगा, आईने त्याला चप्पलीने धू-धू धुतलं


Viral Video : नवरा-नवरीचा स्वॅग भारी; JCBच्या बकेटमध्ये बसून मांडवात एन्ट्री, पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं


कानपूर टेस्टमध्ये 'या' भावाची हवा; व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरीही हैराण


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा