Couple Uses JCB In Wedding : सध्या लग्नसराई सुरु आहे. सोशल मीडियावर नवरा-नवरीचे (Bride-Groom) हटके फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. तर काही हटके फोटो आणि व्हिडीओही व्हायरल  (Viral Video) होत असतात. असाच एक हटके व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नवरा-नवरीनं लग्नमंडपात धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. नवरा-नवरीच्या अनोख्या स्वॅगवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये नवरा-नवरी लग्नमंडपात JCB च्या बकेटमध्ये बसून एन्ट्री घेताना दिसत आहेत. पण या व्हिडीओमध्ये जे पुढे होतं, ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. 


JCBच्या बकेटमधून एन्ट्री पडली भारी 


ट्विटरवर सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरा-नवरी जेसीबीच्या बकेटमध्ये बसून मांडवात एन्ट्री घेतात आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतात. JCB मधून नवरा-नवरी एन्ट्री घेतात आणि त्यानंतर काहीच वेळात जेसीबीच्या बकेटमधून दोघेही खाली कोसळतात. अचानक घडलेल्या या घटनेमुळं उपस्थित सारेच अवाक् होतात. 



व्हिडीओमध्ये काय दिसतंय? 


व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, कार्यक्रमात पाहुणे नवरा-नवरीची वाट पाहत उभे आहेत. तेवढ्यात नव दाम्पत्य JCB च्या बकेटमध्ये बसून हटके स्टाईलमध्ये एन्ट्री घेतात. नवऱ्यानं ब्लॅक ब्लेझर वेअर केला आहे. तर नववधूनं पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. दोघांची एन्ट्री झाल्यावर उपस्थित पाहुणे दोघांचंही अभिनंदन करतात. तेवढ्या जेसीबीचं बकेटची हालचाल होते आणि दोघेही जमिनीवर कोसळतात. 


व्हायरल होतोय व्हिडीओ 


सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ट्विटरवर या व्हिडीओला हजारो व्ह्यू आले आहेत. तसेच कमेंट्सचा पाऊसही पडत आहे. काही युजर्स हा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसत आहेत. तर काही युजर्स JCB वाल्याच्या हलगर्जीपणामुळं त्याच्यावर निशाणा साधत आहेत. ही घटना नेमकी कुठे घडली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :