Kanpur Test:  कानपूरमध्ये (Kanpur Test) न्यूझीलंडविरोधात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं (Indian Cricket Team) चांगली सुरुवात केली आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी रवींद्र जडेजा आणि मॅचमध्ये डेब्यू करणारा श्रेयस अय्यर ही जोडी चर्चेत होती. सध्या या सामन्यातील खेळाडूंची नाही तर एका गुटखामॅनची (Gutkha man) चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. मॅच बघताना काही लोक कोल्ड्रिंक पितात तर काही पॉपकॉर्न खातात. पण गुटखा खात मॅच बघणाऱ्या या गुटखामॅनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.  जाणून घेऊयात गुटखामॅनच्या या व्हायरल व्हिडीओबद्दल-


समाना सुरू असताना कॅमेरामॅन एका माणसाला फ्रेममध्ये घेतो. हा फ्रेममधील माणूस मॅच बघता-बघता गुटखा खात फोनवर बोलताना दिसत आहे. जेव्हा त्याला कळते की तो कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. तेव्हा तो हात उंचावताना दिसतो. या गुटखामॅनवर सध्या अनेक नेटकरी मिम्स तयार करत आहेत. क्रिकेटर वसीम जाफर यांनी सोशल मीडियावर एक मिम शेअर केले आहे. या मिममध्ये त्यांनी हेरा फेरी या चित्रपटातील 'मुंह से सुपारी निकाल के बात कर रे बाबा' हा डायलॉग दिसत आहे.





 
 अनुभव कुमार या नेटकऱ्याने गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील एक सिन आणि गुटखमॅनचा फोटो असा फोटो शेअर केला आहे. त्याला अनुभव यांनी कॅप्शन दिले, 'पान मसाला कंपनी पान मसाल्याची जाहिरात कशी करायची हे दाखवत आहे'





कौशिक युवान यांनी फॅमिली मॅन या वेब सीरिजमधील एका सिनचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीले, 'दोघांची एनर्जी सेम आहे.'