Thailand Elephant Rescue: थायलंडच्या याई नॅशनल पार्कमध्ये  एक हत्तीचं पिलू खड्ड्यात पडलं, त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात त्याची आई देखील खड्ड्यात पडली. खड्ड्यात मोठ्या प्रमाणात चिकट गाळ होता, तेव्हा या हत्तीच्या पिलूला बाहेर काढणं एक आव्हान ठरलं, अखेर या खड्ड्याच्या बाजूला जेसीबी कंपनीच्या मशीनने मोठा खड्डा खणण्यात आला. यातून या पिलाला बाहेर काढण्यात तब्बल सात तासानंतर बचाव पथकाला यश आले.


हत्ती आणि तिचे एक वर्षाचे  पिलू खड्ड्यात पडल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या वन्यप्राणी विशेष तज्ज्ञांच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मुसळधार पावसात देखील बचाव कार्य सुरू होते. बचाव पथकाने दोन हत्तींना खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी त्या खड्ड्याच्या शेजारी एक मॅनहोल तयार केले आणि एक किमी लांबीचा रस्ता बनवला. ज्यामुळे या गाळातून हत्तीला सहज बाहेर पडता येईल.






रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी पशु चिकित्सक डॉ. चाण्या कंचनसारक म्हणाल्या, हत्तीची आई जवळ असल्याने बचाव पथकाला पिलाजव जाणे कठीण होते. त्यामुळे आईला बेशुद्ध करण्यासाठी ट्रॅक्विलायझरचे तीन डोस दिले. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर दोघांना बाहेर काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले.


 बचावपथकाच्या सात तासाच्या प्रयत्नानंतर दोघांनी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. बचावपथकातील कर्मचाऱ्यांनी ट्रकवर चढून लाकडांच्या मदतीने आईला खड्ड्यातून बाहेर काढले. खड्ड्यातून बाहेर येताच भुकेने व्याकूळ झालेले पिलू आईचे दूध प्यायले. त्यानंतर हत्ती आणि तिच्या पिलाला जंगलात सोडण्यात आले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :