Trending Video : सोशल मीडिया म्हणजे रोज नवे व्हिडीओ आणि फोटो लोकांमध्ये व्हायरल करण्याचा एक प्लॅटफॉर्म बनलं आहे. सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडीओ नेटकऱ्यांना इतके आवडतात की, ते ट्रेंडीगमध्ये येतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी चक्क हातावर संपूर्ण शरीराचा तोल सावरत पायाने तिरंदाजी करताना दिसत आहे.


व्हायरल झालेल्या या व्हिडीओतील तरुणीचे कर्तब पाहून नेटकरीही तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.


पाहा व्हिडीओ :



या व्हिडीओत तरुणी आपल्या दोन्ही पायांच्या मदतीने धनुष्यबाण चालवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणी दोन खांबांवर आपल्या हातांनी संपूर्ण शरीराचा भार सावरत आहे आणि खालीडोकं वर पाय करून, ती आपल्या पायांनी तिरंदाजी करत आहे. दोन्ही पायांच्या मदतीने धनुष्यबाण चालवून ती अचूक निशाणा साधताना दिसत आहे. ही तरुणी अतिशय संयमाने आपले लक्ष्य साध्य करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येते.  


पायांनीच केला विक्रम!


या व्हायरल व्हिडीओमध्ये ही तरुणी अतिशय धीराने निशाणा साधत आहे. केवळ दोन्ही हातांच्या मदतीने ती संपूर्ण शरीराला सावरत आहे. कोणताही क्रीडा प्रकार असो, हातांची गरज ही भासतेच. धनुष्य बाण चालवण्यासाठी हाताची आवश्यकता असते, परंतु या मुलीने आपल्या पायानेच हा पराक्रम साध्य केला आहे.


या व्हिडिओमध्ये आणखी एक गोष्ट आश्चर्यचकित करणारी आहे, ती म्हणजे तिच्या जवळील बाणांच्या टोकावर आग जळत आहे. मुलगी पायांच्या सहाय्याने जळत्या बाणाने अचूकपणे निशाणा साधत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.


नेटकऱ्यांनी केले कौतुक!


हा व्हिडीओ एका ट्विटर युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 6 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या जबरदस्त कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. यातील एका युजरने कमेंट करताना लिहिले की, ‘खरोखरच हा एक अतिशय धोकादायक स्टंट आहे.’ दुसर्‍या एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ‘ती खूप हुशार मुलगी आहे.’


महत्त्वाच्या इतर बातम्या