Elon Musk : अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक तसेच टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk)  यांचा ट्विटरसोबतचा करार रद्द झाल्यामुळे ते वादात सापडले, दरम्यान मस्क यांच्याबाबत एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. एलोन मस्कचे वडिल एरोल मस्क यांचे त्यांच्याच सावत्र मुलीशी संबंध आहेत. त्या सावत्र मुलीने तीन वर्षांपूर्वी मस्कच्या वडिलांशी लग्न केले होते. त्यानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. इतकेच नाही तर या दाम्पत्याला आता 2 मुले आहेत.


एलॉनला वडीलांबाबत प्रचंड संताप
न्यूयॉर्क पोस्टनुसार, एरॉल मस्कने एका ब्रिटीश टॅब्लॉइडला दिलेल्या मुलाखतीत आता कबूल केले आहे की, त्यांनी 2019 मध्ये एलोनची सावत्र बहीण जेनापासून एका मुलीला जन्म दिला. तसेच या जोडप्याने 2017 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे, इलियट रशचे स्वागत केले. एलोन मस्कच्या वडिलांचे नाव एरॉल आहे आणि त्यांचे वय 76 पेक्षा जास्त आहे. तर सावत्र मुलगी जेनाचे वय 35 वर्षे आहे. मात्र, एलनला त्याच्या वडिलांच्या या नात्याचा खूप राग आला आहे आणि त्यामुळे अनेक महिन्यांपासून तो त्याच्याशी बोललाही नाही. त्याचवेळी, डेलीमेल या इंग्रजी वेबसाइटनुसार, जेव्हा अॅलनच्या वडिलांनी जनाच्या आईशी लग्न केले तेव्हा जनाचे वय फक्त 4 वर्षांचे होते. त्याचवेळी लग्नाच्या काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.


 






 


एलॉनने म्हणाला, त्याचे वडील एक वाईट व्यक्ती आहेत


जरी एलॉनने याआधी आपल्या वडिलांचे वाईट वर्तन आणि अतिशय वाईट व्यक्ती म्हणून केले होते. यावर एलॉन म्हणाला की, तुम्ही जे काही वाईट विचार करू शकता, ते त्याच्या वडिलांनी केले आहे. या नात्यामुळे इलॉन मस्कच्या कुटुंबात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याच वेळी, एलॉनचे वडील एरोल म्हणाले की, आता त्यांना जेनाच्या आईची आठवण येत नाही.


जेनासोबतच्या नात्यामुळे घटस्फोट झाला


न्युयॉर्क पोस्टनुसार, इलॉन मस्कचे वडील एरोल आणि जेनाची आई 18 वर्षे एकत्र होते आणि दोघांना दोन मुलेही होती. पण नंतर असंही म्हटलं जातं की घटस्फोटाचं कारण जेना होती, एलॉनला त्याच्या वडिलांच्या नात्याबद्दल कळले तेव्हा तोही खूप अस्वस्थ झाला.