एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कर्जबुडव्या विजय मल्ल्याला अटक आणि लगेच जामीन
अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) अर्जानंतर विजय मल्ल्यावर कारवाई करण्यात आली होती.
लंडन : भारतातील बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळालेला विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या काही वेळातच विजय मल्ल्याला जामीनही मिळाला आहे.
लंडनमध्ये मनी लाँडरिंग प्रकरणात विजय मल्ल्याला अटक करण्यात आली होती. ब्रिटनच्या क्राऊन प्रोसिक्युशन सर्व्हिसने त्यासंदर्भात माहिती दिली. अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) अर्जानंतर विजय मल्ल्यावर कारवाई करण्यात आली होती.
कोट्यवधीचं कर्ज बुडवलं
किंगफिशर प्रकरणात विजय मल्ल्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याचा मल्ल्यावर आरोप आहे. मल्ल्याकडून एसबीआय बँकेला 6 हजार 963 कोटींची किंमत येणं अपेक्षित आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचं कर्ज चुकवण्यासाठी ईडीने 1411 कोटींची संपत्ती जप्त केली होती.
विजय मल्ल्यावर कोणत्या बँकेचं किती कर्ज?
स्टेट बँक ऑफ इंडिया – 1600 कोटी
पंजाब नॅशनल बँक – 800 कोटी
आयडीबीआय बँक – 800 कोटी
बँक ऑफ इंडिया – 650 कोटी
बँक ऑफ बड़ोदा – 550 कोटी
यूनायटेड बँक ऑफ इंडिया – 430 कोटी
सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 410 कोटी
यूको बँक – 320 कोटी
कॉर्पोरेशन बँक ऑफ इंडिया – 310 कोटी
सेंट्रल बँक ऑफ म्हैसूर – 150 कोटी
इंडियन ओव्हरसीज़ बँक – 140 कोटी
फेडरल बँक – 90 कोटी
पंजाब सिंध बँक – 60 कोटी
अॅक्सिस बँक – 50 कोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement