एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : 23 फूट अजगराच्या पोटात 54 वर्षीय महिलेचा मृतदेह
इंडोनेशियातील मुना बेटांवर 54 वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह 23 फूट लांब अजगराच्या पोटात आढळला
जकार्ता : 54 वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह 23 फूट लांब अजगराच्या पोटात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंडोनेशियातील मुना बेटांवर हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
54 वर्षीय वा टिबा गेल्या आठवड्यात भाज्या तोडण्यासाठी शेतात गेल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. टिबा यांच्या शेताजवळच त्यांच्या काही वस्तूही सापडल्या होत्या.
टिबा यांच्या शोधासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरु होते. टिबा बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसांनंतर गावकऱ्यांना पोट फुगलेल्या अवस्थेत एक अजगर आढळला होता. गावकऱ्यांनी अजगराची हत्या करुन त्याचं पोट फाडलं.
अजगराच्या पोटामध्ये टिबा यांचा मृतदेह आढळला. विशेष म्हणजे त्यांच्या अंगावरचे कपडेही जसेच्या तसे होते. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इंडोनेशियातच सुलावेसी बेटावर 2017 मध्ये 25 वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह सात फूटी अजगराच्या पोटातून बाहेर काढण्यात आला होता.
व्हिडिओ (व्हिडिओतील काही दृश्यं आपलं चित्त विचलित करु शकतात) :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
निवडणूक
राजकारण
Advertisement