मुंबई: पत्रकारांना एखादी एक्सल्यूझिव बातमी मिळवण्यासाठी तारेवरची मोठी कसरत करावी लागते. पण पाकिस्तानमधील एका न्यूज चॅनेलच्या उतावीळ प्रतिनिधीने वार्तांकनाचे असे काही प्रकार केले, त्याचा जगभरातून तीव्र शब्दात निषेध होत आहे.


 

एक्सप्रेस न्यूज या पाकिस्तानमधील न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधीने पाकिस्तानमधील ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या कबरीत उतरून वार्तांकन केले. विशेष म्हणजे, हे वार्तांकन प्रकाशित करण्याआधी चॅनेलच्या संपादक नदिम फारुक पारचा याने याचे समर्थन करणारे ट्विट केल्याने देशभरातून याचा निषेध करण्यात येत आहे.


 

ईधी हे पाकिस्तानमधील थोर समाजसेवकांमधून गणले जात होते. त्यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर कराचीमध्ये रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र, तत्पूर्वी या वार्ताहराने त्यांच्यावर जिथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, त्या कबरीत उतरून वार्तांकन केल्याने याचा निषेध करण्यात येत आहे.