Coronavirus Vaccine : कोव्हिडने (Covid19) गेल्या दोन वर्षांपासून जगभर हाहाकार माजवला आहे. जगातील प्रत्येक देश या महामारीचा सामना करण्यासाठी झटत आहे. अशा परिस्थितीत फ्रान्सने (France) या महामारीचा सामना करण्यासाठी अधिक खबरदारी घेतली आहे. याच कारणामुळे तो आपल्या देशातील 80 वर्ष ओलांडलेल्या वृद्धांना (Senior Citizens) सुरक्षित ठेवण्यासाठी कोव्हिडचा चौथा डोस सुरू करण्यास मान्यता दिली आहे. हा डोस अशा वृद्धांना दिला जाईल ज्यांनी आधीच तीन बूस्टर डोस घेतले आहेत. फ्रेंच पीएम जीन कास्टेक्स यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांनी तीन महिन्यांपूर्वी बूस्टर डोस घेतला आहे फक्त तेच व्यक्ती हा चौथा डोस घेऊ शकतात. 


सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालण्याचा सल्ला :


वृत्तसंस्था AFP ने Le Parisien या वृत्तपत्राचा हवाला देत म्हटले आहे की, पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही फ्रान्सच्या नागरिकांना फेस मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. कारण फ्रान्स आपले कोव्हिड निर्बंध शिथिल करत आहे. 14 मार्चपासून सार्वजनिक वाहनांमध्येच मास्क घालणे आवश्यक आहे. 


लसीकरण पास बनविण्याची अनिवार्यता समाप्त :    


फ्रान्सने निर्बंध शिथिल करण्यासाठी लस पास बनवण्याची अट रद्द केली आहे. युरोपियन युनियन (EU) मध्ये, ज्यांना कोव्हिडचे तीन डोस मिळाले आहेत आणि त्यांना थिएटर आणि रेस्टॉरंटमध्ये जाण्याची परवानगी होती त्यांनाच लस पास जारी केले जातात. त्यांना सारव्जनिक ठिकाणी कोणतेही बंधन नव्हते.  मात्र, आता या लसीकरण पासची गरज नाही. विशेष म्हणजे, ओमायक्रॉनच्या वेळी, कोव्हिडने फ्रान्समध्ये अधिक हाहाकार माजवला होता. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha