United States : अमेरिकेतील (United States) कॅन्सस (Kansas) येथील एका महिलेला जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटला मदत केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सीएनएनने याबाबत वृत्त दिले आहे. एलिसन एलिझाबेथ फ्लुक-एक्रेन (Allison Elizabeth Fluke-Ekren) असे या महिलेचे नाव आहे. एलिसन ही महिला 2012 मध्ये 100 महिला आणि मुलांच्या बटालियनचे प्रशिक्षण आणि नेतृत्व करण्यासाठी सीरियाला गेली होती.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेने लिबिया, तुर्की आणि इजिप्तमध्ये राहून अन्सार अल-शरिया या दहशतवादी संघटनेसोबत काम केले आहे. न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, या महिलेने सीरियामध्ये राहून 100 हून अधिक महिला ISIS मुलांचा प्रशिक्षण दिले होते. प्रशिक्षण देण्यात आलेल्यांमध्ये अनेकांचे वय त्यावेली 10 वर्षे होते. परंतु, या मुलांना बंदुका, ग्रेनेड आणि आत्मघाती बेल्ट वापरण्यास शिकवले. परंतु, एका सुनावणीदरम्यान फ्लुक-अक्रेनने दावा केला आहे की, ज्या मुलांना तिने प्रशिक्षण देले ती मुले अल्पवयीन होती याची तिला कल्पना नव्हती. "आम्ही हेतुपुरस्सर कोणत्याही तरुण मुलींना प्रशिक्षण दिले नाही," असे फ्लुक-अक्रेनने म्हटले आहे.
फ्ल्यूक-अक्रेन हिने युनायटेड स्टेट्समध्ये दहशतवादी हल्ले करण्याच्या योजनांवर देखील चर्चा केली आहे. त्यापैकी एक योजना म्हणजे एका शॉपिंग मॉलमध्ये स्फोटकांनी भरलेल्या व्हॅनचा स्फोट करणे. फ्ल्यूक-अक्रेन तिच्या दुसऱ्या पतीसह ISIS मध्ये सामील झाली, त्याने सीरियामध्ये स्निपरच्या गटाचे नेतृत्व केले होते. 2016 मध्ये तो हवाई हल्ल्यात ठार झाला.
फ्लुक-अक्रेनला सीरियामध्ये अटक करण्यात आली होती. तिच्यावर ISIS ला मदत करणे आणि संसाधने पुरवण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तिला जास्तीत जास्त 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तिच्या शिक्षेवर 25 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल तुम्ही पाहू शकता. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहा. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.