एक्स्प्लोर

US Iran War : अमेरिका इराणवर अणुहल्ला करणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर व्हाईट हाऊसची भूमिका स्पष्ट

Iran Us Conflicts : आजची रात्र इराणसाठी काळरात्र ठरणार असून इराणचा नामोनिशाण मिटवू अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. त्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढल्याचं चित्र आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणविरोधात केलेल्या तीव्र वक्तव्यानंतर जगभरात अणुहल्ल्याच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय. त्यातच उपराष्ट्रपती जे डी व्हॅन्स यांनी अमेरिकेकडे असे काही अत्याधुनिक आणि विनाशकारी शस्त्रास्त्रे आहेत ज्यांचा वापर अद्याप केला नाही, ट्रम्प त्यावर निर्णय घेऊ शकतात असं वक्तव्य केलं होतं. मात्र, या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.  

Donald Trump Warning To Iran : ट्रम्पच्या वक्तव्यामुळे भीती

मंगळवारी (7 एप्रिल) ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्यामध्ये 'इराणची संस्कृती नष्ट होऊ शकते, आम्ही इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो' अशा शब्दांचा वापर केला होता. या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे अमेरिका इराणवर अणुहल्ला करू शकतो का, अशी भीती अनेक देशांनी व्यक्त केली.

White House Statement : अणुहल्ल्याचा कोणताही विचार नाही

या सगळ्या चर्चांदरम्यान व्हाईट हाऊसने स्पष्ट केलं की, अमेरिकेकडून अण्वस्त्र वापरण्याचा सध्या कोणताही विचार केला जात नाही. उपराष्ट्रपती जे डी व्हॅन्स (JD Vance) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन गैरसमज होत असल्याचंही सांगण्यात आलं.

JD Vance Remark : आमच्याकडे शक्तिशाली साधनं, अमेरिकेचा दावा

जे डी व्हॅन्स यांनी म्हटलं होतं की, अमेरिकेकडे काही अत्याधुनिक साधनं आहेत ज्यांचा वापर अद्याप करण्यात आलेला नाही. आवश्यक असल्यास राष्ट्राध्यक्ष निर्णय घेऊ शकतात. मात्र, याचा अर्थ अणुहल्ला असा नाही, असं व्हाईट हाऊसने स्पष्ट केलं.

Donald Trump Deadline Iran : इराणसाठी वेळेची मर्यादा

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ठराविक वेळेत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचं अल्टिमेटम दिला आहे. तो अल्टिमेटम भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे 5.30 वाजता संपणार आहे. तेहरानने जर अमेरिकेचा प्रस्ताव मान्य केला नाही, तर कारवाई कधीही होऊ शकते, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. चर्चेची प्रक्रिया सुरू असली तरी अंतिम निर्णय अद्याप अनिश्चित आहे.

Middle East Tension : इस्रायलचीही आक्रमक भूमिका

दरम्यान, इस्त्रायलकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. इराणच्या रेल्वे नेटवर्कवर हल्ल्याची धमकी देण्यात आली असून काही ठिकाणी प्रत्यक्ष कारवाईही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
Embed widget