US Inauguration :  अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) अमेरिकेचे 46वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या सोहळ्यात सर्वात आधी कमला हॅरिस (Kamala Harris) शपथ घेतील आणि त्यानंतर राष्ट्रपती जो बायडन यांच्या शपथविधी पार पडेल. कमला हॅरिस भारतीय वेळेनुसार, रात्री 10 वाजता शपथ घेतील आणि जो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्रपती म्हणून रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी शपथ घेतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर व्हाइट हाऊस सोडलं आहे. व्हाइट हाऊस सोडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना वॉशिंग्टन विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर जो बायडन यांनी ट्विट करत, 'अमेरिकेसाठी एक नवा दिवस' असल्याचं म्हटलं आहे.


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विट करत जो बायडन यांचं अभिनंदन केलं आहे. 'माझे मित्र जो बायडन तुमचं अभिनंदन…ही तुमची वेळ आहे,' असं ट्विट करत बराक ओबामा यांनी सोबत एक फोटोदेखील ट्विट केला आहे.


डोनाल्ड ट्रंप यांना वॉशिंग्टन एअरपोर्टवर गार्ड ऑफ ऑनर


डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाउस खाली केलं आहे. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर त्यांना वॉशिंग्टन एअरपोर्टवर गार्ड ऑफ ऑनर दिलं गेलं. आपल्या समारोपाच्या भाषणात ट्रम्प यांनी आपला परिवार आणि मित्रांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, काही ना काही करुन आम्ही पुन्हा परत येऊ. मी आपल्यासाठी नेहमीच संघर्ष करत राहिल, असं ते म्हणाले. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रम्प स्वत:चा एक नवा पक्ष काढणार असल्याची माहिती आहे.


आम्ही पुन्हा परत येऊ


डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, आमच्या कार्यकाळात आम्ही अनेक महत्वाचे निर्णय घेतले. तुम्ही सर्वांनी खूप मेहनतीनं काम केलं. माझ्यासाठी हा कार्यकाळ खूप खास राहिला. आम्ही अमेरिकी सेनेला पुन्हा उभं केलं. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक टॅक्सचा भरणा केला, असं ट्रम्प म्हणाले. ते म्हणाले की, आम्ही जेवढ्या मेहनतीनं काम केलं तेवढ्या मेहनतीनं कुणी काम करु शकणार नाही. काही ना काही करुन आम्ही पुन्हा परत येऊ. मी नेहमी आपल्यासाठी संघर्ष करत राहील.


US Inauguration : White House सोडल्यानंतर Donald Trump पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांकासह 'या' ठिकाणी करणार वास्तव्य


ते म्हणाले की, मी नेहमी आपल्यासाठी लढत राहील. या देशाच्या उज्वल भविष्यासाठी काम करेल. मी नवीन प्रशासनाला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या यशासाठी प्रार्थना करतो. मला वाटतं की त्यांच्याकडे काही चांगलं करण्यासाठी मजबूत पाया आहे. ट्रम्प म्हणाले की, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपली आहे. आपल्याला महामारीचा मोठा फटका बसला. आपण असं काही केलं की मेडिकल क्षेत्रात चमत्कार मानला जातो. आपण 9 महिन्यात कोरोनावर वॅक्सिन तयार केलं, असंही ट्रम्प म्हणाले.





अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ आज संपला आहे. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर ट्रम्प फ्लोरिडातील पाम बीचजवळील आपल्या 'मार-ए-लागो' येथे वास्तव्य करणार आहेत. व्हाईट हाऊस सोडताना ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मेलानिया ट्रम्प उपस्थित होत्या. राष्ट्राध्यक्षपदाच्या चार वर्षाच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी या ठिकाणी बराच वेळ घालवला होता. त्यामुळे या ठिकाणाला 'विंटर व्हाइट हाउस'देखील म्हटले गेले. ट्रम्प यांनी सप्टेंबर 2019 मध्ये आपले अधिकृत निवासस्थान न्यूयॉर्क ट्रम्प टॉवरमधून बदलून मार-ए-लागो केले होते. अनेक वर्ष न्यूयॉर्कमध्ये वास्तव्य असलेले ट्रम्प यांनी 1985 मध्ये एक कोटी डॉलरमध्ये हे घर खरेदी केले होते.



महत्त्वाच्या इतर बातम्या :