US Inauguration Day 2021 Livestream: अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) अमेरिकेचे 46वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या सोहळ्यात सर्वात आधी कमला हॅरिस (Kamala Harris) शपथ घेतील आणि त्यानंतर राष्ट्रपती जो बायडन यांच्या शपथविधी पार पडेल. कमला हॅरिस भारतीय वेळेनुसार, रात्री 10 वाजता शपथ घेतील आणि जो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्रपती म्हणून रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी शपथ घेतील. अशातच जगातील सर्वाज जुन्या लोकशाहीमध्ये नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळा यावेळी अनेक जुन्या परंपरा मोडीत काढत आणि नव्या अपवादात्मक परंपरांमध्ये पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्यामध्ये लेडी गागा राष्ट्रगीत गाणार असून जेनेफर लोपेज गाणं सादर करणार आहे.


डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाउस सोडलं
डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाउस खाली केलं आहे. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर त्यांना वॉशिंग्टन एअरपोर्टवर गार्ड ऑफ ऑनर दिलं गेलं. आपल्या समारोपाच्या भाषणात ट्रम्प यांनी आपला परिवार आणि मित्रांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, काही ना काही करुन आम्ही पुन्हा परत येऊ. मी आपल्यासाठी नेहमीच संघर्ष करत राहिल, असं ते म्हणाले. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रम्प स्वत:चा एक नवा पक्ष काढणार असल्याची माहिती आहे.


US Inauguration Day 2021 Schedule: जो बायडन आज घेणार राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; 'असा' असणार सोहळा


जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यासंदर्भातील रोचक गोष्ट


मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांना वेस्ट फ्रंटमध्ये शपथ देतील. बायडन आपल्या कुटुंबातील 127 वर्षांपूर्वीच्या 'बायबल'ला साक्षी ठेवून शपथ घेतील. यादरम्यान त्यांची पत्नी जिल बायडन आपल्या हातात बायबल घेऊन उभ्या राहतील. अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक वयाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणारे बायडन शपथ घेतल्यानंतर लगेचचं राष्ट्राला राष्ट्रपती म्हणून आपलं पहिलं संबोधन करतील. ऐतिहासिक भाषण भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक विनय रेड्डी तयार करत आहेत. जे एकता आणि सौहार्दावर आधारित असणार आहे.


कमला हॅरिस की, जो बायडन? कोण घेणार पहिली शपथ? अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीबाबतच्या रंजक गोष्टी


कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्यासंदर्भातील रोचक गोष्ट


कमला हॅरिस आज अमेरिकेच्या उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणाऱ्या त्या पहिल्या महिला, पहिल्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई व्यक्ती ठरणार आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या लॅटिन सदस्य न्यायमूर्ती सोनिया सोटोमेयर पदाची शपथ घेणार आहेत. सोटोमेयर यांनीच बायडन यांना 2013 मध्ये उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली होती. कमला हॅरिस दोन बायबल साक्षी ठेवून शपथ घेतील. त्यातील एक बायबल त्यांच्या कौटुंबिक मित्र परिवारातील रेगिना शेल्टन यांचं असणार आहे. तर दुसरं देशाच्या पहिला आफ्रिकन वंशाचे अमेरिकी सुप्रीट कोर्टाचे न्यायाधीश थुरगूड मार्शल यांचं असेल.


शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोड बंदोबस्त


शपथविधी सोहळ्या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या शपथविधी सोहळ्याचा संपूर्ण आराखडा बदलण्यात आला आहे. जो बायडन यांच्या टीममधील अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या नागरिकांना राजधानीत गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. बायडन यांचा शपथविधी समारंभापूर्वी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी जवळपास 25 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.



महत्त्वाच्या इतर बातम्या :