वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस शपथ घेणार आहेत. बायडन यांचा शपथविधी समारंभापूर्वी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी जवळपास 35 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथविधी समारंभ अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. असं सांगितलं जात आहे की, या शपथविधी समारंभासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र अनुपस्थित राहणार आहेत.


कधी होणार शपथविधी?


अमेरिकी वेळेनुसार, शपथविधी सकाळी 10 वाजता सुरु होणार आहेत. दरम्यान, वॉशिंग्टनची वेळ भारतीय वेळेहून 10 तास 30 मिनिटं पुढे आहे.


शपख घेतल्यानंतर जो बायडन देशाला संबोधित करणार आहेत. असं मानलं जात आहे की, या संबोधना दरम्यान बायडन पुढील 4 वर्षांसाठी राष्ट्राप्रतीचं त्यांचं व्हिजन सांगू शकतात.


मिळालेल्या माहितीनुसार, जो बायडन कोरोनाविरोधातील लढा, अमेरिकेची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासोबतच राष्ट्राची एकता अबाधित ठेवण्यासाठी आपल्या योजनांवर प्रकाश टाकतील.


डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक निर्णय बदलू शकतात


असं सागितलं जात आहे की, बायडन राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेले काही विवादीत निर्णय पलटू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, बायडन यांनी आपल्या कार्यकाळापूर्वी 10 दिवसांत घेतलेल्या निर्णयांची यादी तयार केली आहे. या यादीत मुस्लिम देशांवर घालण्यात आलेलेल प्रतिबंध रद्द करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. शपथविधी समारंभानंतर ते इतरही अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर आपली स्वाक्षरी करु शकतात.