US Inauguration Day 2021 :अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस शपथ घेणार आहेत. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष होणार आहेत. त्या दृष्टीनं पाहता हा ऐतिहासिक प्रसंग आहे


बायडन यांचा शपथविधी समारंभापूर्वी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथविधी समारंभ अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे.


कधी होणार शपथविधी?


भारतीय वेळेनुसार उपराष्ट्रपती कमला हॅरीस रात्री 10 वाजता शपथ घेतील त्यानंतर रात्री 10.30 वाजता राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा शपथविधी पार पडेल.  या शपथविधी सोहळ्यात गायिका-नृत्यांगना लेडी गागा राष्ट्रगीत गाणार आहे. तर, अमांडा गोरमॅन या शपथविधी सोहळ्यासाठी लिहीलेली एक खास कविता वाचून दाखवतील. अभिनेत्री जेनिफर लॉपेझ गाणं सादर करणार आहे.


अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक वयाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणारे बायडन शपथ घेतल्यानंतर लगेचचं राष्ट्राला राष्ट्रपती म्हणून आपलं पहिलं संबोधन करतील. ऐतिहासिक भाषण भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक विनय रेड्डी तयार करत आहेत. जे एकता आणि सौहार्दावर आधारित असणार आहे.


संबंधित बातम्या :



US Inauguration Day 2021 | जो बायडन आज शपथ घेणार; अमेरिकेच्या अध्यक्षांचा पगार किती, सुविधा कोणत्या?