वॉशिग्टन: अमेरिकेतील 12 वर्षावरील बालकांना Pfizer ची कोरोना लस देण्यास अन्न आणि औषधं प्रशासनाकडून (FDA) मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची मान्यता याच आठवड्यात मिळण्याची शक्यता असून पुढच्या आठवड्यापासून 12 ते 15 वयोगटातील बालकांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अमेरिकेतल्या 16 वर्षावरील सर्वांना Pfizer ची लस देण्याच्या निर्णयाला या आधीच मंजुरी मिळाली आहे.
Pfizer कंपनीने 12 ते 15 वयोगटातील बालकांवर आपल्या लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास गेल्या महिन्यापूर्वीच केला आहे. त्यामध्ये ही लस बालकांवरही प्रभावी असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आता या लसीच्या वापराला या आठवड्यातच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतल्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 10.5 कोटी नागरिकांचे पुर्णपणे लसीकरण झाले असून 14.7 कोटी लोकांना लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले अमेरिकेतील नागरिक आता विनामास्क घराबाहेर फिरु शकतात. या नागरिकांना छोट्या ग्रुपमध्ये भेटता येईल, परंतु त्यांनी गर्दीची ठिकाणं टाळावीत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन अमेरिकेच्या या संस्थेने गेल्या आठवड्यात हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी कोरोनामुक्त झालेल्या इस्रायलने देखील अशाच प्रकारचं पाऊल उचललं होतं. तिथेही काही नियमांसह विनामास्क घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. इस्रायलमधील सुमारे 60 टक्के लोकसंख्येचं लसीकरण झालं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kangana Ranaut Twitter Suspended: अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड, वादग्रस्त वक्तव्य भोवलं
- IPL 2021 Suspended: कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळं यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द
- कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक देणं-घेणं कायद्यानं गुन्हा; महिला आणि बालविकास विभागाचा इशारा