मुंबई: आपल्या वादग्रस्त ट्वीट्समुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कंगनाने आपल्या ट्वीट्सच्या माध्यमातून वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यावर आता ट्विटरने कारवाई करत तिचे अकाऊंट सस्पेंड केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


देशातील वेगवेगळ्या मुंद्द्यावरून कंगना सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत होती. शेतकरी आंदोलनापासून ते नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर तिने आपली मतं मांडली होती. 


देशातील वेगवेगळ्या मुंद्द्यावरून कंगना सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत होती. शेतकरी आंदोलनापासून ते नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर तिने आपली मतं मांडली होती. कंगना रनौतचे ट्विटरवर लाखो फॉलोअर्स होते. सुरुवातील क्वीन कंगना या नावाने सुरू झालेले तिचे अकाऊंट नंतर कंगना रनौत या नावाने व्हेरिफाईड झालं होतं. 


सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर तिने वादग्रस्त वक्तव्यं करण्यास सुरूवात केली. तिने आपल्या ट्वीट्सच्या माध्यमातून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरतीही टीका केली होती. दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनातील हिंसाचारानंतर तिने आंदोलकांना खलिस्तानवादी म्हटलं होतं. त्यानंतर तिने आपला मोर्चा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे वळवला. कंगनाने थेट  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका सुरू केली. 


अगदी अलिकडचे तिचे ट्वीट म्हणजे तिने देशात कोरोनाचा हाहाकार माजला असताना, देशात अनेक ठिकाणी ऑक्सिनजचा तुटवडा असताना त्यावर आपलं मत मांडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. ऑक्सिजनविना लोक तडफडू लागले आहेत. हे लक्षात घेता, देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभे करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जास्तीत जास्त ऑक्सिजन उत्पादन करून ते रुग्णांपर्यंत पोचवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. असं असताना कंगनाने मात्र एक नवाच बेसूर आळवला आहे.  तिने म्हटलं आहे की, "ज्यांना हा ऑक्सिजन दिला जाणार आहे, त्यांनी पर्यावरणासाठी प्रतिज्ञा करायला हवी. ती आपल्या ट्वीटमध्ये म्हणते की, माणसासाठी ऑक्सिजन बनवण्याचं सरकार ठरवतं आहे, त्याचवेळी सरकारने निसर्गासाठीही काही योजना जाहीर कराव्यात. जी मंडळी हा ऑक्सिजन घेणार आहेत, त्यांनी वातावरणातली हवा आणखी शुद्ध होण्यासाठी काम करण्याची प्रतिज्ञाच करायला हवी. निसर्गाकडून घेतलेलं त्याला परत न देणारे आपण, असा उच्छाद आणखी किती काळ मांडणार आहोत." अशाच प्रकारचे आणखी दोन ट्वीट्स तिने केली आहेत. 



महत्वाच्या बातम्या: