एक्स्प्लोर

Pegasus spyware पेगासस हेरगिरी प्रकरण; अमेरिकेने घेतला 'हा' मोठा निर्णय

Pegasus News : कथित हेरगिरी प्रकरणात वापरण्यात आलेल्या पेगासस स्पायवेअर विकसित करणाऱ्या इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुपबाबत अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

Pegasus Issue: जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या पेगासस हेरगिरी प्रकरणी अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने पेगासस स्पायवेअर विकसित करणाऱ्या इस्रायलच्या एनएसओ ग्रुपला काळ्या यादीत टाकले आहे. काही महिन्यांपूर्वी एनएसओ ग्रुपच्या पेगासस या स्पायवेअरने जगातील काही देशांमधील महत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी झाल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. 

अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने याबाबतचे एक वक्तव्य जारी केले होते. पेगासस स्पायवेअर कथितपणे पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, जगभरातील विरोधी पक्ष नेत्यांची हेरगिरी करण्यासाठी वापरण्यात आले होते. या कारणास्तव बुधवारी एनएसओ ग्रुप आणि आणखी एक इस्रायली कंपनी कँडिरूचा काळ्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

एनएसओ ग्रुप आणि आणखी एक इस्रायली कंपनी कँडिरू यांनी परदेशातील सरकारांसाठी स्पायवेअर तयार केले होते. या स्पायवेअरच्या मदतीने सरकारी अधिकारी, पत्रकार, व्यावसायिक आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांची हेरगिरी करण्यात आली.

एनएसओ ग्रुपला काळ्या यादीत टाकण्याबाबत अमेरिकेने म्हटले की, अमेरिकन सरकार मानवाधिकारांना आपल्या परराष्ट्र धोरणात केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार, चुकीच्या हेतूने वापर होत असलेल्या डिजीटल उपकरणांचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याशिवाय, सायबर गुन्हेगारीचा मुकाबला करणे आणि बेकायदेशीर हेरगिरीला आळा घालण्याचेही काम असल्याचे अमेरिकेने म्हटले. 

अमेरिकेने इस्रायली कंपनी कँडिरू आणि एनएसओ ग्रुपशिवाय इतर दोन कंपन्यांनाही काळ्या यादीत टाकले आहे. यामध्ये सिंगापूर येथील कॉम्प्युटर सिक्युरिटी इनिशिएटिव्ह कन्सल्टेंसी पीटीई (COSEINC) आणि रशियन कंपनी पॉझिटीव्ह टेक्नोलॉजीचा समावेश आहे. या कंपन्यांचा समावेश काळ्या यादीत केल्याने अमेरिकेत या कंपन्यांकडून कोणतीही सेवा खरेदी केली जाऊ शकत नाही. 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही माध्यमसमूहांनी पेगासस हेरगिरी प्रकरण समोर आणल्यानंतर खळबळ उडाली होती. भारतासह अनेक देशांच्या पत्रकारांची पेगासस मार्फत हेरगिरी करण्यात आली असल्याचे समोर आले. काही देशांनी पेगासस प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

मृत्यूलाही भीडला पण नाद नाही सोडला! सायकलवरुन फिरला 191 देश, 2 लाख किलोमीटरचा प्रवास, 19 वर्षे जगभर भ्रमंती
मृत्यूलाही भीडला पण नाद नाही सोडला! सायकलवरुन फिरला 191 देश, 2 लाख किलोमीटरचा प्रवास, 19 वर्षे जगभर भ्रमंती
Bhutan Glacial Lake Burst: भूतानमध्येही 'नेपाळी' थरकाप! हिमनदीचे सरोवर फुटताच प्रचंड विध्वंस, महामार्ग आणि रस्ते उखडले, प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा सुद्धा वाहून गेला, भारतात बंगाल आणि आसाममध्ये पुराचा इशारा
भूतानमध्येही 'नेपाळी' थरकाप! हिमनदीचे सरोवर फुटताच प्रचंड विध्वंस, महामार्ग आणि रस्ते उखडले, प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा सुद्धा वाहून गेला, भारतात बंगाल आणि आसाममध्ये पुराचा इशारा
एल निनोचा जगावर परिणाम, तापमानात मोठी वाढ, पुढील सहा महिन्यात 55 हजार मृत्यू होण्याची शक्यता, धक्कादायक माहिती समोर
एल निनोचा जगावर परिणाम, तापमानात मोठी वाढ, पुढील सहा महिन्यात 55 हजार मृत्यू होण्याची शक्यता, धक्कादायक माहिती समोर
Israel Election 2026 :इस्रायल सत्तासंग्राम: 'नेतान्याहू विरोधकांची आघाडी की पुन्हा राजकीय पेच? इस्रायलमध्ये नव्या समीकरणांची नांदी
इस्रायल सत्तासंग्राम: 'नेतान्याहू विरोधकांची आघाडी की पुन्हा राजकीय पेच? इस्रायलमध्ये नव्या समीकरणांची नांदी

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, बँक खाते चेक करा
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणं सुरु, बँक खाते तपासा
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
Nashik Mahakumbh: महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
Punjab AAP Candidate List: आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार, 35 दिवसांचा राज्यव्यापी दौरा, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार, आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार,राज्यव्यापी दौऱ्यात आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
Eknath Shinde Shivsena: महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
Pune Crime News : मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
Rohit Pawar Ujani Dam: पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
Embed widget