एक्स्प्लोर

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तान तोंडघशी, काश्मीर मुद्यावरुन फक्त चीनचा पाठिंबा, इतर देश भारतासोबत

दहशतवाद थांबवला तरच आपल्यात चर्चा शक्य असल्याचे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत (UNSC) भारताने दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या वर्मावर बोट ठेवले आहे.

नवी दिल्ली : दहशतवाद थांबवला तरच आपल्यात चर्चा शक्य असल्याचे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत (UNSC) भारताने दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या वर्मावर बोट ठेवले आहे. काश्मीरला विशेष दर्जा आणि अधिकार देणारं कलम 370 भारताने रद्द केल्याच्या मुद्दयावरुन चीनच्या मागणीनुसार शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक झाली. त्या बैठकीत काश्मीरप्रश्नी झालेल्या सर्व करारांवर ठाम असल्याचे भारताच्या वतीने आवर्जून सांगण्यात आले. काश्मीरच्या मुद्यावरुन पाकिस्तानला केवळ चीनने पाठिंबा दिला आहे. तर अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स हे देश भारतासोबत आहेत. यूएनएससीच्या बैठकीमध्ये सय्यद अकबरुद्दीन हे भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. बैठकीनंतर अकबरुद्दीन यांनी प्रसारमाध्यमांसमोर भारताची बाजू ठामपणे मांडली. अकबरुद्दीन म्हणाले की, काश्मीरप्रश्नी भारताकडून सर्व आंतरराष्ट्रीय करारांचे नियमांनुसार पालन करण्यात आले आहे. परंतु काही लोक कट्टर विचारसरणीच्या प्रचारासाठी काश्मीरमधील परिस्थिती भयावह असल्याच्या आरोळ्या ठोकत आहेत. अकबरुद्दीन म्हणाले की, आम्ही आमच्या जनतेचा रक्तपात करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी काश्मीरमध्ये खबरदारीची पावले उचलली आहेत. काश्मीरमध्ये सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरते काही निर्बंध लावले आहेत. आम्ही ते निर्बंध टप्प्या टप्प्याने हटवू. तसेच कलम 370 रद्द करणे, हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय संबंधांवर काहीही परिणाम होणार नाही. परंतु तिथे सुरक्षेची कामे करताना या मुद्द्यावर आम्ही केलेल्या विविध करारांशी आम्ही बांधील आहोत. अकबरुद्दीन यांनी सांगितले की, जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी आम्ही विविध योजना आखल्या आहेत. जम्मू काश्मीरच्या मुख्य सचिवांनी त्यांच्या घोषणा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Embed widget