US News : भारतीय वंशाचे रवी चौधरी (Ravi Chaudhary) यांची अमेरिकच्या संरक्षण उपमंत्रीपदी निवड झाली आहे. त्यांच्याकडे अमेरिकी हवाई दलाची जबाबदारी असणार आहे. पेंटागनमधील सर्वोच्च पदांपैकी हे एक पद आहे.
रवी चौधरी यांनी यापूर्वी अमेरिकेच्या परिवहन विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. एरोस्पेस आणि संरक्षण तज्ज्ञ असून त्यांनी यापूर्वी अमेरिकन हवाई दलात उच्च पदांवर काम केले आहे. तसेच चौधरी हे अमेरिकन हवाई दलात वैमानिक आणि अधिकारी म्हणून देखील काम पाहिले आहे. चौधरी 1993 ते 2015 या काळात एअरफोर्सचे अॅक्टिव्ह मेंबर होते. या कालावधीत त्यांनी ऑपरेशन आणि फंक्शनल अशा दोन डिव्हीजनचे नेतृत्व केले आहे. सी-17 चे देखीलत ते पायलट होते
अफगाणिस्तान आणि इराक युद्धातील अनेक ऑपरेशनमध्ये ते सहभागी होते. इराकमध्ये बरेच दिवस ते कार्यरत होते. चौधरी हे एविएशन इंजिनिअर देखील आहेत. अमेरिकेच्या हवाई दलाला लेटेस्ट टेक्नॉलाॉजी देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमीका बजावली आहे. ओबामा यांच्या कार्यकाळात रवि चौधरी हे प्रेसिडेंट अॅडव्हाजरी कमिशनचे सदस्य होते.
अमेरिकेच्या संरक्षणाची जबाबदारी ही पेंटागनवर आहे. पेंटागन येथून जगावर लक्ष ठेवले जाते. अनेक महत्वाच्या मोहिमांची आखणी येथूनच केली जाते. संरक्षण उपमंत्री ही महत्वाची भूमिका असते. आता ही भूमिका भारतीय वंशांचे रवी चौधरी सांभाळणार असून त्यांच्याकडे अमेरिकेच्या हवाई दलाची जबाबदारी राहणार आहे. अमेरिकेचे हवाईदल जगात पहिल्या क्रमांकाचे हवाईदल आहे.