Leena Nair :  भारतीय वंशाच्या लीना नायर (Leena Nair) यांची मंगळवारी (14 डिसेंबर) लंडनमधील फ्रेंच लक्झरी समूह शनेलच्या जागतिक मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लीना नायर या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत आणि त्या 2013 मध्ये लंडनला स्थायिक झाल्या होत्या.


लग्जरी ग्रुप शनॅल (Chanel) यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. लीना नायर या युनीलीव्हरमधील (unilever) सर्वात कमी वयाच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO) होत्या.  युनीलीव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एलन जोप यांनी सांगितलं की, 'लीनानं गेल्या तीन दशकात कंपनीसाठी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांचे मी आभार मानतो.'


कोल्हापूरच्या लीना नायर यांचा परदेशात डंका
लीना नायर या कोल्हापूरमध्ये राहातात. त्यांचं शालेय शिक्षण हे कोल्हापूरमधील  होली क्रॉस या शाळेत झालं. नंतर त्या पुढील शिक्षणासाठी  जमशेदपूर येथे गेल्या. जमशेदपूरमधील झेव्हियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट (XLRI) येथे त्यांनी शिक्षण घेतले. सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये त्यांनी इंजिनिअरिंगचे धडे घेतले.  


2013 मध्ये लंडनमध्ये शिफ्ट झाल्या लीना नायर
लीना नायर या 52 वर्षाच्या आहेत. त्या 2013 मध्ये शिफ्ट झाल्या होत्या. त्या 2016 मध्ये  युनीलीव्हरमधील सर्वात कमी वयाच्या पहिला महिला सीएचआरओ झाल्या होत्या. त्याआधी लीना या Anglo-Dutch कंपनीच्या लंडन हेक्वॉर्टरमध्ये लिडरशीप आणि  ऑर्गेनायजेशन  डेव्हलपमेंट ग्लोबल वाइस प्रेसिडेंट होत्या. 


ग्लोबल कंज्यूमर गुड्स कंपनीत लीना यांनी 30 वर्ष काम केलं. अलीकडेच त्यांनी एचआर चीफ आणि एग्जिक्युटिव्ह कमिटीत सदस्य म्हणून काम केलं. 'करिअर बाय चॉईस' या उपक्रमाच्या माध्यमातून काम सोडलेल्या महिलांना पुन्हा काम देण्यात त्यांचं योगदान आहे. लीना नायर या त्यांच्या कामाच्या माध्यमातून भारताचं नाव जगभरात उंचावतील यात शंका नाही.


एलेन वर्थाइमर (Alain Wertheimer) आणि जेरार्ड वर्थाइमर (Gerard Wertheimer) हे शनेल कंपनीचे मालक आहेत. हे कंपनीचं ग्लोबल एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन हे पद सांभाळतील.


इतर बातम्या :


Electric Vehicle : वाढत्या प्रदुषणामुळे अमेरिकेचा इलेक्ट्रिक वाहनांवर भर, चार्जिंग सुविधांसाठी योजनांचे अनावरण


Omicron Virus Death : ओमायक्रॉन व्हेरियंटचा जगात पहिला बळी, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची माहिती


Elon Musk Update : इलॉन मस्क '2021 पर्सन ऑफ द इयर', टाईम मॅगझिनकडून मोठा सन्मान