Russia Ukraine conflicts : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली. त्यानंतर रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या प्रमुख शहरांमधून दहा लाखांहून अधिक लोकांनी पलायन केले आहे. तर अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या या हल्ल्यानंतर युक्रेनच्या माजी हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन विटाली क्लिट्स्कोने (Vitali Klitschko) रशियाविरुद्ध आपल्या भावासोबत रणांगणात उतरण्याची घोषणा केली आहे.
विटालीचा भाऊ व्लादिमीर क्लिट्स्को हा हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन आहे. दोन्ही भावांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. 50 वर्षीय विटाली क्ल्युश्कोने गुरूवारी युद्धात सहभागी होण्याची घोषणा केली.
रशियाविरोधात युद्धात उतरण्याची घोषणा केल्यानंतर विटाली क्लिट्स्को म्हणतो की, 'माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मला हे करावे लागेल. मी लढेन माझा युक्रेनवर विश्वास आहे. माझा देश आणि तेथील लोकांवर विश्वास आहे. मी माझ्या भावासोबत रशियाविरोधात रणांगणात उतरणार आहे.
विटाली क्ल्युश्को हा युक्रेनची राजधानी कीवचा महापौर असून, 'कीव शहर संकटात आहे. पोलीस आणि लष्करासोबतच वीज, गॅस आणि पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याला पहिले प्राधान्य आहे, अशी माहिती विटालीने दिली आहे.
विटालीचा भाऊ व्लादिमीर क्लिट्स्को आधीच युक्रेनियन रिझर्व्ह आर्मीमध्ये भरती झाला आहे. गुरुवारी त्याने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो की, 'युक्रेनचे लोक मजबूत आहेत आणि हे या युद्धात खरे ठरेल. येथील लोक शांतता आणि सार्वभौमत्वाची अपेक्षा करतात. युक्रिनचे लोक रशियाच्या लोकांना आपले भाऊ मानतात. युक्रेनच्या लोकांना युद्ध नको आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. युक्रेनच्या जनतेने लोकशाहीची निवड केली आहे."
महत्वाच्या बातम्या
- Russia-Ukraine Conflicts : मी पुतिनची आई असते तर... रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अभिनेत्री झाली ट्रोल
- Russia Ukraine Crisis : युक्रेनवरील हल्ल्यानंतर ब्रिटनने रशियावर लादले नवे निर्बंध, रशियन बँका लंडनच्या आर्थिक व्यवस्थेबाहेर
- Russia Ukraine War : रशियन फौजांचा चेर्नोबिल अणू प्रकल्पावर ताबा; जगाच्या चिंतेत भर
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर असा होईल परिणाम; जाणून घ्या प्रमुख मुद्दे