Russia Ukraine War :शियाने युक्रेनच्या डोन्बास प्रांतावर हल्ला करण्यासह युक्रेनच्या राजधानीवर हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली. रशियाच्या हल्ल्याचा युक्रेनच्या सैन्याने प्रतिकार सुरू केला आहे. युक्रेनच्या इतर शहरांमध्येही विमानतळावर हल्ले झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर युक्रेनने डझनभर रशियन सैनिक मारल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या लष्कराने आतापर्यंत 50 रशियन सैन्याचा खात्मा केला आहे आणि पूर्वेकडील 6 युद्धनौका नष्ट केल्या आहेत.


आतापर्यंत 50 रशियन सैन्याचा खात्मा


रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. बॉम्बस्फोटासाठी क्षेपणास्त्रांचा वापर सुरूच आहे. यावर युक्रेनने डझनभर रशियन सैनिक मारल्याचा दावा केला आहे. त्यात म्हटले आहे की, युक्रेनच्या लष्कराने आतापर्यंत ५० रशियन सैन्याचा खात्मा केला आहे आणि पूर्वेकडील ६ युद्धनौका नष्ट केल्या आहेत. दुसरीकडे, सुरक्षा कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये रशियन लष्करी वाहने क्रिमियामधून युक्रेनमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसून आले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घोषणेनंतर रशियन लष्कराने गुरुवारी युक्रेनविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली. रशियाच्या या कृतीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध होत आहे. पुतिन यांनी इतर देशांनाही इशारा दिला आहे की, रशियन कारवाईत हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास असे त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.


7 जणांनी जीव गमवावा तर 9 जण जखमी 
आज सकाळी, कीव, खार्किव, ओडेसा आणि युक्रेनमधील इतर शहरांमध्ये जोरदार स्फोट ऐकू आले. रशियाने लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ब्लोदिमिर झेलेन्स्की यांनी देशात 'मार्शल लॉ' घोषित केला आणि नागरिकांना घाबरू नका असे आवाहन केले. ते म्हणाले की, रशियाच्या हल्ल्यात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. युक्रेनचे अध्यक्ष ब्लोदिमीर झेलेन्स्की यांनी इतर जागतिक नेत्यांना देशाला संरक्षण सहाय्य देण्याचे आणि रशियापासून त्याच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी जारी केलेल्या निवेदनात झेलेन्स्की म्हणाले की, रशियाने युक्रेन आणि संपूर्ण लोकशाही जगाविरुद्ध युद्ध पुकारले आहे. त्यांनी जागतिक नेत्यांना देशाला संरक्षण सहाय्य देण्याचे आणि रशियाच्या आक्रमणापासून त्याच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


 


Russia Ukraine Conflict, Russia Ukraine Conflict, Russia Ukraine War, Vladimir Putin