Russia Ukraine Crisis : युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यातील युद्ध अद्यापही सुरुच आहे. युक्रेन आणि रशिया (Ukraine Russia War) यांच्यातील संघर्षाला दहा महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष (President of Russia) व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युद्ध संपण्याचे संकेत दिले आहेत. रशिया युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार असल्याचं पुतिन यांनी सांगितलं आहे. पुतिन यांनी एका कार्यक्रमात माध्यमांना प्रतिक्रिया देत सांगितंल आहे की, ते युद्धामध्ये सामील सर्व पक्षांसोबत चर्चा करण्यासाठी तयार आहेत. पण युक्रेन आणि पश्चिमेकडील देशांनी त्यांच्यासोबत चर्चेला नकार दिला आहे.


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी म्हटलं की, आम्ही या युद्धजन्य परिस्थितीमध्ये संभाव्य तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यास तयार आणि इच्छुक आहोत. पण युक्रेन आणि पश्चिमेकडील देश आमच्याशी याबाबत चर्चा करण्यास तयार नाहीत. त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. संघर्ष आता त्यांच्यावर अवलंबून आहे.


'निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्याचे रशियाने केलं मान्य'


युक्रेनमधील निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्याचे रशियाने मान्य करावं असं युक्रेन म्हटलं आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की याचे सल्लागार यांनी रशियाबाबत एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'पुतिन यांनी दोन गोष्टी मान्य कराव्यात. पहिली गोष्ट म्हणजे पुतिन यांनी मान्य करावं की, त्यांनी युक्रेनमधील निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. दुसरी गोष्टी म्हणजे रशियाला युद्धाच्या बाबतीत चर्चेतून मार्ग काढायचा नाहीय. रशिया चर्चेसाठी तयार नाही. त्यामुळे युद्धाची पूर्ण जबाबदारी रशिया घेईल.'  






'आम्ही योग्य दिशेने पाऊले उचलली आहेत'


न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'आम्ही आमच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करत आहोत. आम्ही आमच्या लोकांसाठी, आमच्या नागरिकांसाठी हे करत आहोत, आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.'


अमेरिकन अधिकारी आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी पुतीन यांच्या या वक्तव्याला गांभीर्याने घेतलेले नाही. दरम्यान, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार व्लादिमीर झेलेन्स्की यांनी ट्विट केले आहे की, रशियाने आधी हे मान्य केले पाहिजे की ते चर्चा करण्यासाठी तयार नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Russia Ukraine War : 'पुतिन यांच्या चेहऱ्यावर ठोसा मारण्याची इच्छा', झेलेन्स्की यांचा संताप अनावर