Corona Vaccine Protects Blood Cancer Patients: कर्करोग झालेल्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते. त्यामुळे त्यांना कोरोना विषाणूची झटक्यात लागण होते अन् आजारी पडण्याचं प्रमाणाही वाढतं. त्याशिवाय विविध प्रकारच्या कॅन्सर उपचारांमुळे कोरोना लसीकरणानंतर SARS-CoV-2 विरोधात कमी प्रमाणात अथवा अँटिबॉडीच तयार होत नाहीत. दुसरीकडे लसीकरणानंतर टी सेल्सला अॅक्टिव्ह होऊ शकतात, जो दीर्घकाळापर्यंत रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतो. (Covid vaccine protect from blood cancer)
एलएमयू म्यूनिख (LMU Munich) च्या मेडिकल सेंटर-यूनिवर्सिटी ऑफ फ्रीबर्गैंड (Medical Center-University of Freiburgand) चे वायरोलॉजिस्ट प्रो. ओलिवर टी. केप्लर , डॉ. एंड्रिया केप्लर-हाफकेमेयर आणि डॉ. क्रिस्टीन ग्रील यांच्या नेतृत्वातील एका पथकानं रुग्णांच्या रोगप्रतिकारकशक्तीवर काही महिने अभ्यास केला. त्या अभ्यासानंतर त्यांचा अनुभव त्यांनी प्रसिद्ध केलाय. ज्या रुग्णांना कर्करोग (ब्लड कॅन्सर) झाला आहे अन् त्यांनी कोरोनाच्या तिन्ही लसी घेतल्या आहेत. अशा रुग्णांनामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचं समोर आले, असे अभ्यासात समोर आलं. ज्यांनी कोरोना लसीचे तीन डोस घेतले अशा कर्करोग रुग्णांना SARS-CoV2 पासून होणाऱ्या गंभीर आजारांपासून लढण्यास मदत होते, असे अभ्यासातून समोर आले.
हा अभ्यास दोन प्रकारच्या ब्लड कॅन्सर असणाऱ्या रुग्णांवर करण्यात आली होती. बी-सेल लिंफोमा आणि मल्टीपल मायलोमा या दोन प्रकराच्या ब्लड कॅन्सरच्या रुग्णावर अभ्यास करण्यात आला. डॉ. एंड्रिया केप्लर-हाफकेमेयर म्हणाले की, 'अभ्यासात भाग घेतलेल्या सर्व व्यक्तींवर केलेल्या या अभ्यासाच्या निकालांवरून असे दिसून आले की, लसीकरण झालेल्या सर्व रुग्णांमध्ये टी सेलचा चांगला प्रतिसाद दिसून आला. ' डॉ. क्रिस्टीन ग्रील म्हणाले की, 'अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांमध्ये संक्रमणाची खूप लक्षणे कमी प्रमाणात दिसून आली. कारण लसीकरणानंतर तयार झालेल्या अँटिबॉडीच्या थेरपीमुळे कोरोना संक्रमणाची लक्षणं कमी प्रमाणात जाणवली असू शकतात.'
चीनमध्ये कोरोनाचा कहर
चीनमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा सबव्हेरियंट BF.7 चा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे 3.7 कोटी रुग्ण सापडले आहेत तर, 18 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालयांमध्ये जास्त गर्दी वाढली आहे. रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जागाच शिल्लक नाही, अशी परिस्थिती आहे. लोकांना जमिनीवर ठेऊन उपचार करावे लागत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांचा खच पडला आहे. चीनमधील परिस्थितीनंतर जगभरातील देश पुन्हा एकदा सतर्क झाले आहेत. सर्वांनी खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना लसीकरणावरही भर दिला जात आहे. भारतामध्येही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.