Ukraine Russia War :  नेदरलँड्समधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) युक्रेनने रशियाविरुद्धचा खटला जिंकला आहे. ICJ ने रशियाला युक्रेनमधील लष्करी कारवाया त्वरित थांबवण्याचे आदेश दिले आहेत. ICJ ने दिलेला हा आदेश आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बंधनकारक आहे. आयसीजेच्या आदेशानंतर युक्रेनचे राष्ट्राअध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, "रशियाने ताबडतोब आपल्या देशात परत गेले पाहिजे. ICJ च्या आदेशाचे उल्लंघन केल्यास रशिया आणखी एकटे पडेल."


न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनच्या जमिनीवर सुरू केलेल्या लष्करी कारवाया तत्काळ स्थगित कराव्यात. याबरोबरच रशियन फेडरेशन पुढील लष्करी कारवाईसाठी कोणतीही पावले उचलणार नाही याची खात्री करेल. दोन्ही देशांनी वाद चिघळणाऱ्या कृतीपासून दूर राहावे, असे आदेश न्यायालयाने म्हटले आहे. 






 ICJ कडून युक्रेनचे कौतुक  


रशियाला कडवी झुंज दिल्याबद्दल ICJ ने युक्रेनचे कौतुक केले आहे. युक्रेनची जनता, सैनिक आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियन आक्रमणाविरुद्ध दिलेला लढा कौतुकास पात्र आहे, असे कौतुक करत रशिया समर्थक देशांनी रशियाला लष्करी मदत देऊ नये, असे आवाहनही न्यायालयाने केले आहे.


24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यादिवसापासून दोन्ही देशांत युद्धाला सुरुवात झाली. आज युद्धाचा 21 वा दिवस आहे. आत्तापर्यंत दोन्ही देशांमध्ये युद्ध संपवण्यासाठी चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत. परंतु, अद्यापपर्यंत या चर्चांचा कोणताही सकारात्मक परिणाम झालेला नाही. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोक आणि हजारो सैनिक मारले गेले आहेत. तर लाखो लोक युक्रेन सोडून गेले आहेत.


महत्वाच्या बातम्या