New Covid Variant: इस्रायलमध्ये (Israel) एका नव्या कोरोनाच्या व्हेरियंटने (Corona) धुमाकूळ घालण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. कारण बुधवारी देशात नव्या व्हेरियंटने (Corona New Varient) बाधित दोन नवे रुग्ण समोर आले आहेत. एएफपी न्यूज एजन्सीने (AFP News Agency) याबाबत माहिती दिली आहे. कोविड-19 च्या काही महिन्यांपूर्वी समोर आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा हा उपप्रकार असून BA.1 आणि BA.2 असं नाव या व्हेरिंटला देण्यात आलं आहे. इस्रायलच्या बेन गुरियन एअर टर्मिनलवर दोन प्रवाशांमध्ये हा विषाणू पीसीआर चाचणीदरम्यान (PCR Corona Test) आढळला आहे.
इस्रायल मंत्रालयाने (Israel Ministry) एक निवेदन समोर आणले आहे. ज्यामध्ये त्यांनी या व्हेरियंटबाबत दिलेल्या माहितीत म्हटले आहे की,"हा प्रकार अद्याप जगासाठी अज्ञात आहे. आतापर्यंत सापडलेल्या दोन प्रकरणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि स्नायू दुखीसारखी सौम्य लक्षण आढलली आहेत. त्यांना सध्यातरी कोणत्याही विशेष वैद्यकीय प्रतिसादाची आवश्यकता नाही." इस्रायलमधील साथी रोग प्रतिसाद प्रमुख, सलमान जरका यांनी दिलेल्या या माहितीमुळे कुठेतरी चिंता कमी झाल्याचं म्हटलं जात आहे.
कोविडविरुद्ध लढाईत इस्रायल सक्रीय
मंगळवारी, इस्रायलमधील 6 हजार 310 व्यक्तींनी कोविड चाचणी केली. यातील 10.9 टक्के नागरिकांच्या चाचण्या सकारात्मक आल्या. सध्या 335 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 169 जण प्राथमिक स्थितीत आहेत. तर 151 जणांना ऑक्सीजन पुरवण्यात येत आहे. इस्रायलच्या 9.2 दशलक्ष लोकसंख्येपैकी चार दशलक्षाहून अधिक लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. इस्रायलने कोरोनाव्हायरस विरूद्ध जगातील सर्वात जलद लसीकरण मोहीम चालवली होती.
हे ही वाचा -
- Corona : चीन-सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ, भारतात 12-14 वयोगटातील मुलांना जास्त धोका?
- Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 237 रुग्णांची नोंद तर रिकव्हरी रेट 98.10 टक्के
- Coronavirus Update : कोरोनाची चौथी लाट येणार का? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha