एक्स्प्लोर

Ukraine Drone Attack: यूक्रेनचा हजारो ड्रोनद्वारे रशियावर सर्वात मोठा हल्ला, 1900 ड्रोन रोखल्याचा रशियाचा दावा, 2 जणांचा मृत्यू

Ukraine Drone Attack : यूक्रेननं रशियावर सर्वात मोठा हल्ला केला आहे. रशियाच्या हल्ल्यात 2 रशियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

मॉस्को: यूक्रेननं रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. यूक्रेननं हजारो ड्रोन रशियाच्या दिशेने सोडले. आतापर्यंतच्या माहितीनुसार रशियाकडून यूक्रेनचे 1900 ड्रोन रोखण्यात आले आहेत. यूक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात 2 रशियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियातील संसदीय निवडणुकींच्या अखेरच्या दिवशी मॉस्कोत ड्रोन हल्ले करण्यात आले. एका मोठ्या रिफायनरीचं नुकसान देखील झालं आहे. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी ड्रोन हल्ल्यांसदर्भात माहिती दिली. 

यूक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रात्रभर रशियाकडून कीव्हवर हल्ले करण्यात आल्याचं सांगितलं आहे. रशियाच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला, त्यात तीन लहान मुलांचा समावेश होता. रशिया आणि यूक्रेनकडून एकमेकांवरील हल्ले तीव्र केले जात आहेत.  

मॉस्कोच्या गव्हर्नरनं काय म्हटलं? 

मॉस्कोचे गव्हर्नर आंद्रे वोरोब्योव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की ड्रोन हल्ला हा मोठा हल्ला होता. यूक्रेनच्या हल्ल्यात एका 44 वर्षीय महिलेचा आणि एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्य झाला आहे. वोरोब्योव यांनी म्हटलं की एका 21 मजली इमारतीला ड्रोनच्या हल्ल्यामुळं आग लागली, तिथून 400 लोकांना बाहेर काढण्यात आलं. मॉस्को ऑइल रिफायनरीच्या एका भागात नुकसान झालं असून आपत्कालीन सेवा कार्यरत असल्याचं त्यांनी म्हटलं. यूक्रेननं यापूर्वी देखील या रिफायनरीवर हल्ले केले आहेत. ड्रोन हल्ल्याद्वारे यूक्रेनचा रशियाच्या निवडणुकीत हस्तक्षेपाचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील वोरोब्योव यांनी केला. मात्र, त्यांना यात यश आलं नाही, असंही ते म्हणाले.   

यूक्रेनचे राष्ट्रपती काय म्हणाले? 

यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर  झेलेन्स्की यांनी ड्रोन हल्ल्याचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की काल रात्री मॉस्कोमध्ये आमच्या हल्ल्याचा चांगला परिणाम दिसून आला. रशियन तेल ठिकाणांच्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि लॉजिस्टिक सेंटरवर हल्ला करण्यात आला.  

दरम्यान, RIA नोवोस्ती वृत्तसंस्थेनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की  रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी म्हटलं यूक्रेनच्या खेरसॉनवर रशियाचा कब्जा असून तिथ एका प्रवासी बसवर ड्रोन हल्ला झाला, ज्यात दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक निवडणूक अधिकारी देखील होता.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Advertisement

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Embed widget