China Uighur Muslim : चीनच्या (china) शिनजियांग (xinjiang) प्रांतात उइगर मुस्लिमांप्रति (Uighur Muslim) भेदभाव आणि अत्याचार केले जात आहेत. चीनच्या शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांवर सातत्याने अत्याचार केला जात आहे. लोकांना येथे जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले जात आहे. यापासून लहान मुलेही सुटलेली नाहीत. संयुक्त राष्ट्राच्या (UN Report) एका समितीने याबाबत माहिती दिली आहे.
शिनजियांगमधील उइगर मुस्लिमांवर अत्याचार
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) च्या अहवालानुसार, शिनजियांगमध्ये उइगर मुस्लिमांप्रति भेदभाव केला जातोय. तसेच त्यांना जबरदस्तीने मजुरीसाठी भाग पाडले जात आहे. चीनवर अनेक दिवसांपासून उइगर मुस्लिमांना भेदभावपूर्ण वागणूक दिल्याचा आरोप आहे. चीनने आपले रोजगार नियम आणि धोरणे जागतिक मानकंनानुसार बनवावीत, असे संयुक्त राष्ट्राकडून (UN) म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये, चीनवर याआधी अनेकदा उइगर मुस्लिमांशी भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे, चीन आपल्या मर्जीनुसार वागत आहे. शिनजियांगमध्ये उइगर लोक मोठ्या संख्येने आहेत, परंतु चीनच्या चुकीच्या धोरणांमुळे त्यांच्यावर अनेकदा दडपशाही केली जाते. येथे अनेकदा जाती आणि धर्माच्या आधारे लोकांना लक्ष्य केले जाते. भेदभावपूर्ण वागणुकीमुळे उइगरांना शोषित आणि अत्याचारी वाटतात.
चीनचे दडपशाही धोरण
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार, चीनने 1964 च्या रोजगार धोरण परिषदेतील अनेक नियमांचे पालन केले जात नाही. चीन सरकारने 1997 मध्ये याची अंमलबजावणी केली. त्यात स्वातंत्र्यासह रोजगार निवडण्याच्या अधिकाराचाही समावेश होता. इंटरनॅशनल लेबर स्टँडर्ड्स नावाच्या अनेक पानांच्या अहवालात तज्ञ समितीने मूल्यांकन केले आहे. हे बालकामगार, मातृत्व संरक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, संधी या संदर्भात समानतेबद्दल बोलते. अहवालात असे म्हटले आहे की, चीन शिनजियांग (झिनजियांग) मध्ये उइगर आणि इतर तुर्क आणि मुस्लिम अल्पसंख्याक समुदायांवर जबरदस्ती करण्यात येत आहे. त्यावर चीनचे मात्र असे म्हणणे आहे की, ते लोकांची गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : दिलासादायक! कोरोनाची तिसरी लाट ओसरली; गेल्या 24 तासांत 27 हजार 409 नवे कोरोनाबाधित
- Hijab Controversy : कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुनावणी, तीन सदस्यीय खंडपीठ करणार सुनावणी
- Viral Video : विमानात साप दिसल्याने प्रवाशांमध्ये खळबळ, व्हिडिओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha