Viral Video : सापाच्या नावाने अनेकांची घाबरगुंडी उडते. आता चक्क एअर एशियाच्या (Air Asia) विमानात साप सापडल्याने खळबळ उडाली आहे. आता विमानातील सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 10 फेब्रुवारी रोजी मलेशियाची राजधानी क्वालालंपूरला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानाने उड्डाण केले. प्रवासादरम्यान विमानामध्ये काहीतरी रेंगाळत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. यानंतर बारकाईने पाहिले असता साप असल्याचे दिसून आले. 


विमानात साप दिसल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. विमानात साप दिसल्यानंतर विमान कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना घाबरू नका असे सांगितले. त्यानंतर वैमानिकाने विमान कुचिंग शहराच्या दिशेने वळवले. त्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.






 


या संपूर्ण प्रकरणात एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, ही घटना कोणत्याही फ्लाईटमध्ये होऊ शकते. एअर एशियाच्या सुरक्षा अधिकाऱ्याने इमर्जन्सी लँडिंग केल्याने धोका टळला. त्यानंतर सापाला विमानातून बाहेर काढण्यात आले. विमानात साप कसा घुसला हे मात्र कळू शकलेले नाही. तो विमानात प्रवाशासोबत आला होता किंवा बाहेरून विमानात घुसला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha