एक्स्प्लोर

जपानला 'हगिबीस' चक्रीवादळाचा तडाखा, 11 जणांचा मृत्यू, लाखो लोकांचं स्थलांतर

मागील 60 वर्षांमधील सर्वात शक्तीशाली चक्रीवादळाने जपानची राजधानी टोकियोच्या समुद्रकिनाऱ्यावर धडक दिली आहे. वादळादरम्यान टोकियो आणि आसपासच्या परिसरात झालेला जोरदार पाऊस आणि तुफान वाऱ्यामुळे जपानला अक्षरश: झोडपून काढलं आहे.

टोकियो : मागील 60 वर्षांमधील सर्वात शक्तीशाली चक्रीवादळाने जपानची राजधानी टोकियोच्या समुद्रकिनाऱ्यावर धडक दिली आहे. वादळादरम्यान टोकियो आणि आसपासच्या परिसरात झालेला जोरदार पाऊस आणि तुफान वाऱ्यामुळे जपानला अक्षरश: झोडपून काढलं आहे. या चक्रीवादळामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, तर 17 जण बेपत्ता आहेत. जपानी सरकारने आतापर्यंत एक लाख लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर केलं आहे. फिलिपिन्स या देशात या चक्रीवादळाला 'हगिबीस' असे नाव दिले आहे. तिथल्या स्थानिक भाषेत 'हगिबीस'चा अर्थ वादळी वारे असा आहे. गेल्या सहा दशकांमध्ये असे चक्रीवादळ आले नव्हते. 1958 साली अशा चक्रीवादळाने जपानमध्ये थैमान घातले होते. त्यावेळी तब्बल 1200 हून अधिक लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. तर हजारो लोकांना बेघर व्हावं लागलं होतं. 'हगिबीस' वादळादरम्यान वारे तब्बल 216 किमी प्रति तास इतक्या वेगाने वाहत होते. त्यामुळे रस्त्यांवरील मोठी वाहनेदेखील दूरवर फेकली गेली. वादळाने टोकियोमध्ये हाहःकार उडवला आहे. टोकियोमधल्या हवामान विभागाने 'हगिबिस' वादळाची पूर्वसूचना दिली होती. त्यामुळे सरकारने नागरिकांचे स्थलांतर सुरु केले. तसेच नागरिकांनी पाणी आणि अन्नाचा साठा करून ठेवला होता. त्यामुळे मोठी हानी टळली. दरम्यान वादळाची भिती अद्याप टळलेली नाही. टोकियो, गनामा, सैटामा, कानागावा, फुकुशिमा शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान शिझुओका भागाला 5.3 रिष्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. 'आपण याआधी कधीच पाहिला नसेल, असा मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तयार रहा, तसेच सुखरुप राहण्यासाठी खबरदारी घ्या, असा इशारा स्थानिक हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने सांगितले आहे की, हगिबीसमुळे जपानमधील अनेक नद्यांना पूर येऊ शकतात, समुद्रकिनाऱ्यांना सर्वाधिक धोका आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलनाची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. उपाययोजना म्हणून जपानी सरकारने विमानसेवा बंद ठेवली आहे. दोन हजार विमान उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच रेल्वेसेवादेखील बंद ठेवण्यात आली आहे. चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, कारखाने, शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. तसेच लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जपानला 'हगिबीस' चक्रीवादळाचा तडाखा, 11 जणांचा मृत्यू, लाखो लोकांचं स्थलांतर

महत्त्वाच्या बातम्या

Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Parking Space Controversy : अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Embed widget