Coronavirus Update : जगात कोरोनाचा कहर अद्याप कमी झालेला नाही. त्यातच आता ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omicron) पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेतीस शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या ओमायक्रॉन या प्रकाराचे दोन नवे स्ट्रेन शोधले आहेत. या नव्या उपप्रकारांना BA.4 आणि BA.5 असं नाव देण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञ टुलिओ डी ऑलिव्हेरा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी या संदर्भात माहिती देत सांगितले आहे की, 'दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचे दोन नवे सब-व्हेरियंट आढळून आले आहेत. अद्याप या दोन नव्या स्ट्रेनचा संसर्ग वाढलेला नाही. मात्र, नमुन्यांमध्ये या ओमायक्रॉनच्या नव्या BA.4 आणि BA.5 उपप्रकार समोर आले आहेत.'


ओमायक्रॉनचे नवे उपप्रकार BA.4 आणि BA.5 यामध्ये एकमेकांपासून काहीशी वेगळी जणुकीय रचना आढळून आली आहे. शास्त्रज्ञांना या नव्या सब-व्हेरियंटचे नमुने बोत्सवाना, बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क आणि अमेरिकेतही आढळून आले आहेत.






 


जागतिक आरोग्य संघटना ओमायक्रॉन या उपप्रकाराच्या दोन नवीन सब-व्हेरिएंटचे निरीक्षण करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे की, ते कोरोनाचा सर्वाधिक संसर्गजन्य प्रकार ओमायक्रॉनच्या दोन नवीन उपप्रकारांचे परीक्षण करत आहे. हे उपप्रकार BA.4 आणि BA.5 म्हणून ओळखले जातात. हे नवे स्ट्रेन ओमायक्रॉनच्या उपप्रकारांच्या यादीत जोडली गेली आहेत. आता जागतिक स्तरावर BA.1 आणि BA.2 या सब-व्हेरियंटच्या अधिक रुग्णांची नोंद होत आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) सध्या BA.4 आणि BA.5 या दोन नवीन स्ट्रेनचं निरीक्षण करत आहे. ओमायक्रॉनचे BA.1 आणि BA.2 हे स्ट्रेन अधिक संसर्गजन्य असल्याचं समोर आलं आहे. आता संघटना BA.4 आणि BA.5 या सब-व्हेरियंटने निरीक्षण करून हे स्ट्रेन अधिक सांसर्गिक आणि धोकादायक आहेत का याचं निरीक्षण करत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha