Surya Grahan 2021 : 2021 या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan 2021) उद्या म्हणजेच 4 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. या दिवशी  शनि अमावस्या (Shani Amavasya 2021) देखील आहे. त्यामुळे सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या हे दोन्ही एकाच दिवशी येणे हा एक अद्भुत योगायोग मानला जात आहे. सूर्यग्रहणाचा प्रभाव भारतात दिसणार नाही.  4 डिसेंबरला होणारे सूर्यग्रहण अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिका येथे दिसणार आहे. जाणून घेऊयात किती तास सूर्यग्रहण असणार आहे. 


2021 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 4 डिसेंबर सकाळी 10 वाजून 59 मिनीटांनी सुरू होणार आहे. हे सूर्यग्रहण  3 वाजून 7 मिनीटांपार्यंत राहणार आहे. या सूर्यग्रहाणाचा काळ हा चार तास आठ मिनीटे आहे. वृश्चिक आणि ज्येष्ठा नक्षत्रात सूर्यग्रहण होणार आहे. अशा परिस्थितीत या राशी आणि नक्षत्राच्या लोकांवर या ग्रहणाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे  या काळात वृश्चिक राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.


पंचांगानुसार, अमावस्या 3 डिसेंबरला दुपारी 04:55 वाजता सुरू होईल आणि 4 डिसेंबरला पहाटे 01:12 वाजता संपेल. 4 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाला उपछाया ग्रहण असे म्हटले जात आहे. हे संपूर्ण ग्रहण नाही.  2021  या वर्षात दोन सूर्यग्रहण जाले होते. वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे  10 जून 2021 रोजी झाले. 
 
पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे 30 एप्रिल रोजी होणार आहे. हे आंशिक ग्रहण असेल असे म्हटले जात आहे, ज्याचा प्रभाव दक्षिण-पश्चिम अमेरिका, पॅसिफिक अटलांटिक आणि अंटार्क्टिकामध्ये दिसेल. 


संबंधित बातम्या-


Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार


Skin Care Tips : चेहऱ्यावरील पिम्पल्स होतील दूर; 'हे' टोनर ठरेल फायदेशीर, जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत


Omicron : ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर, सुरक्षेसाठी कशी घ्याल काळजी?