एक्स्प्लोर
तुर्कीतील लग्नात आत्मघाती स्फोट, 30 जणांचा मृत्यू

अंकारा : तुर्कस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये 30 जणांना जीव गमवावा लागला आहे. सिरियाच्या सीमेजवळ असणाऱ्या गजनीटेप शहरात एका लग्नसमारंभात हा स्फोट झाला. या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला असून 94 जण जखमी आहेत. शनिवारी रात्री 11 च्या सुमारास हा स्फोट झाला असून यामागे कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आयसीसने हा आत्मघाती हल्ला घडवून आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोनच दिवसांपूर्वी सुरक्षा दलाला टार्गेट करत तुर्कस्तानच्या काही भागात स्फोट घडवण्यात आले होते. त्या स्फोटांमध्येही 14 जणांचा मृत्यू झाला होता, तर तब्बल 220 जण जखमी झाले होते. 19 ऑगस्ट रोजी झालेल्या या हल्ल्यात पोलीस आणि सैन्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं.
Before You Go
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?






















