Earthquake In Turkey: तुर्कीत (Turkey) 7.9 तीव्रतेचा भूकंप (Turkey Earthquake) शक्तीशाली भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपामुळे तुर्कीत प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून प्रचंड जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू (Epicenter of an Earthquake) दक्षिण तुर्कीत असून मृत्यूचा आकडा हजारोंच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय सिरीया (Syria), लेबनान (Lebanon), सिपरस (Cyprus), जॉर्डन (Jordan), इजिप्त (Egypt), आणि इजराइलला (Israel) देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
तुर्कस्तानच्या (Turkey News) नुरदगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिअॅक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.8 इतकी मोजली गेली आहे. हा भूकंप दक्षिण तुर्कीमध्ये झाला. बीएनओ न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, येथे अनेक अपार्टमेंट आणि इमारती कोसळल्या आहेत. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून मालमत्तेचीही हानी झाल्याची माहिती मिळत.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंप स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:17 वाजता सुमारे 17.9 किमी खोलीवर झाला. यूएस जियोलॉजिकल सर्विसनं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दक्षिण तुर्कीमधील गॅझियानटेपजवळ 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक वेळेनुसार तुर्कीमध्ये पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी भूकंप झाला. तुर्कस्तानच्या गॅझियानटेपजवळ भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळतेय. भूकंपाच्या जोरदार धक्क्याने अनेक इमारती कोसळल्या. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
तुर्की हाय अलर्टवर
बीएनओ न्यूजनुसार, तुर्कस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाचं म्हणणं आहे की, शक्तिशाली भूकंपानंतर तुर्कीत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर येत आहेत. भूकंपामुळे झालेलं नुकसान सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडींओंमध्ये स्पष्टपणे दिसतंय.
अनेक इमारती कोसळून जमीनदोस्त झाल्याचं व्हिडीओंमध्ये पाहायला मिळतंय. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. लोक भयभीत होऊन आक्रोश करताना दिसत आहेत. सध्या हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये ते तुर्कीतील भूकंपाचे असल्याचा दावा केला जात आहे.