मुंबई : आज नववर्षातलं पहिलं चंद्रग्रहण होणार आहे. ब्लडमून, सुपरमून आणि खग्रास चंद्रग्रहणाचा एकाच वेळी येण्याचा हा योग जुळून आला आहे. मात्र हे खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लडमून भारतात दिसणार नाही आहे. परंतू सूपरमूनचं भारतात दर्शन होणार आहे. आज सायंकाळी 6 वाजून 39 मिनिटांपासून सुपरमून पाहता येणार आहे.
खग्रास चंद्रग्रहणाच्या काळात पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका रेषेत असतील. हे खग्रास चंद्रग्रहण मिडल ईस्ट, आफ्रिका, यूरोप, अमेरिका, ओसेनिआ आणि रशियाचा पूर्वभाग येथून दिसणार आहे. या देशातील खगोलप्रेमी मोठ्या उत्साहाने या घटनेची वाट पहात होते. या ठिकाणाहून ब्लडमून, सुपरमून आणि वुल्फमून यांचे दर्शन होणार आहे.
या वर्षात एकूण 5 ग्रहणे असतील. यात 3 सूर्यग्रहणे तर 2 चंद्रग्रहणे असतील.
'सूपरमून' म्हणजे काय?
‘सुपरमून‘ म्हणजे मोठे व जास्त तेजस्वी चंद्रबिंब साध्या डोळ्यांनी पाहता येईल. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर चंद्रबिंब आकाराने 14 टक्के मोठे व 30 टक्के जास्त प्रकाशित दिसते. या चंद्राला ‘सूपरमून‘ म्हणतात. यावेळी चंद्र पृथ्वीपासून 3 लाख 57हजार,342 किमी. अंतरावर येणार आहे. नूतन वर्षातील पहिल्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘वुल्फमून‘ असेही म्हणतात.
'ब्लड मून' म्हणजे काय?
पृथ्वीची सावली अंतराळात पडले आणि या छायेत चंद्र येतो. त्यामुळे चंद्राचा रंग पौर्णिमा असूनही तेजस्वी न दिसता काळसर, लालसर, तांबडा दिसतो. त्यामुळे त्याला ब्लड मून असं म्हटलं जातं. या वर्षात दुसऱ्यादा चंद्रग्रहणात ब्लड मून दिसणार आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नववर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आज, भारतात सूपरमून दिसणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jan 2019 07:12 AM (IST)
नववर्षातलं हे खग्रास चंद्रग्रहण मिडल ईस्ट, आफ्रिका, यूरोप, अमेरिका, ओसेनिआ आणि रशियाचा पूर्वभाग येथून दिसणार आहे. या देशातील खगोलप्रेमी मोठ्या उत्साहाने या घटनेची वाट पहात होते. या ठिकाणाहून ब्लडमून, सुपरमून आणि वुल्फमून यांचे दर्शन होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -