Google Map: गुगलवर अशी अनेक ठिकाणे आहेत, जी तुम्ही तुमची इच्छा असताना ही पाहू शकत नाही. गेल्या महिन्यात अॅपलचे सीईओ टीम कुक यांचे घर गुगल मॅपवरून हटवण्यात आले होते. त्यामागील कारण म्हणजे, एक महिला गुगल मॅपवर पाहून कुक यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुगल मॅपवरून त्यांचा घराचे लोकेशन ब्लर करण्यात आले आहे. असे असले तरी जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी गुगल मॅपवर पाहता येत नाहीत. कारण ही ठिकाणे गुगल मॅपवर ब्लर करण्यात आली आहेत. 'द सन'च्या वृत्तानुसार, गुगलने आपल्या नकाशावरून अनेक ठिकाणांचे लोकेशन हटवले आहे. अशाच काही खास ठिकाणांबद्दल जाणून घेऊया, ज्या गुगलने आपल्या मॅपवरून हटवले आहेत.
गुगलने मध्य फ्रान्समधील तुरुंगाचे लोकेशन आपल्या मॅपवर ब्लर केले आहे. 2018 मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव फ्रेंच सरकारच्या विनंतीवरून हे करण्यात आले आहे. तसेच मोरुरोआ हे दक्षिण प्रशांत महासागरातील एक लहान बेट असून त्याचे लोकेशन देखील हटवण्यात आले आहे. या बेटाचा अणु इतिहास असल्याने असे करण्यात आल्याचं सांगण्यात येत.
ब्रिटनमधील प्रिन्सपोर्ट रोडवर असलेल्या Stockton-on-Tees चे लोकेशन देखील गुगलवरून हटवण्यात आले आहे. बर्फाने झाकलेले हे बेट 1.2 मैल लांब आहे. रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे हे बेट गुगल मॅपवर ब्लर करण्यात आले आहे, असे बोलले जात आहे. याशिवाय उत्तर कोरियाचे अनेक भाग गुगलवर पाहता येत नाहीत. ग्रीसची राजधानी अथेन्समधील लष्करी तळही गुगल मॅपवर पूर्णपणे ब्लर करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Romania Parliament House : बाबो! चक्क चंद्रावरून दिसते ही आकर्षक इमारत; वीस लाख मजूरांनी केली तयार
- Trending News : मुलीच्या घरी डेटसाठी गेला अन् अचानक तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली; कारण माहितीये?
- Viral Video : चहाप्रेमींनो 'हा' 'फ्रुट टी' प्यायलात का? सुरतमध्ये मिळतोय सफरचंद, केळी आणि चिकूचा चहा; व्हिडीओ पाहून थक्क व्हाल