Romania Parliament House : जगभरातील आकर्षक इमारती पाहण्यासाठी पर्यटक नेहमी उत्सुक असतात. भारता(India)तील ताज महल (Taj Mahal) आणि चीन(China)मधील ग्रेट वॉल ऑफ चायना (Great Wall of China) या ऐतिहासिक स्थळांना पर्यटक आवर्जुन भेट देतात. पण एका आकर्षक इमारतीची चर्चा सध्या सोशल मीडियार सुरू आहे. रिपोर्टनुसार, रोमानिया येथील संसद भवन हे (Romania Parliament House) चंद्रावरुन देखील दिसते. या संसद भवनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


असं म्हटलं जातं की,  निकोले सेओस्कूने ( Nicolae Ceaușescu) लोकांसाठी काम करण्याऐवजी संसदेची ही मोठी इमारत बांधण्यासाठी पैसे खर्च केले. या हुकूमशहाच्या या कृत्याने तेथील जनता प्रचंड संतापली होती.  रोमानिया देशात क्रांती झाली. त्यानंतर निकोले सेओस्कूला आणि त्याच्या पत्नीला गोळ्या घालून मारण्यात आलं. 


लाखो मजूरांनी तयार केली इमारत 
रोमानिया येथील संसद भवन इमारतीला तयार करण्यासाठी जवळपास तीन खरब रुपये खर्च करण्यात आले. 23 वेगवेगळ्या भागांमध्ये ही इमारत तयार करण्यात आली आहे. तसेच या भवनात जवळपास एक हजार खोल्या आहेत. इमारतीच्या भींतीची 8 मीटर उंच असून ही इमारत 3 लाख 65 हजार चौरस मीटर परिसरामध्ये तयार करण्यात आली आहे.  इमारतीच्या आजूबाजूला सर्वत्र हिरवळ आहे. अनेक पर्यटक ही इमारत पाहण्यासाठी रोमानियाला भेट देतात. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha