Gold Price in India : रशिया युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) गेल्या महिनाभराहून अधिक काळ सुरु आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर तर होतोच आहे. परंतु, या युद्धाचे पडसाद भारतीय बाजारपेठेवरही उमटताना दिसतायत. त्यामुळेच सोन्या-चांदीच्या दरात अस्थिरता पाहायला मिळतेय.   


Emkay Wealth Management च्या अहवालानुसार :  


नुकत्याच, एम्के वेल्थ मॅनेजमेंटच्या (Emkay Wealth Management) ‘नॅव्हिगेटर’ नावाच्या अहवालानुसार, सोन्याचे दर काहीसे अस्थिर आहेत. परंतु, रशिया-युक्रेन युद्धाची परिस्थिती संपुष्टात आली तर सोन्या-चांदीच्या दरात घसरण होऊ शकते असं या अहवालात म्हटलं आहे. काही देशांत सोन्याचे दर वाढले आहेत तर काही देशांत युद्धाचे पडसाद उमटले नाहीत. यामध्ये यूके वगळता उर्वरित युरोपमध्ये आतापर्यंत व्याजदरात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे विलंब होण्याची शक्यता आहे. यूएस फेडच्या आक्रमक भूमिकेमुळे यूएस डॉलरचे उत्पन्न वाढल्याने आणि चलन मजबूत झाल्यामुळे काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यूएस डॉलरमध्ये उद्धृत केलेल्या वस्तूंच्या किंमती हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. जर हे युद्ध कमी प्रमाणात झाले तर सोन्याच्या दरात घट होऊ शकते. 


पूर्व युरोपमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर सोन्याचे दर US$ 2070 पर्यंत वाढले. तथापि, युद्धाची परिस्थिती थोडीशी शिथिल झाल्यामुळे, सोन्याच्या किमती US$ 1923 पर्यंत खाली आल्या आहेत. US$1760 ते US$1860 च्या श्रेणीत, जवळपास सहा महिने स्थिर राहिले.


भारतात केवळ सोन्या-चांदीच्या दरातच नाही तर कच्च्या तेलाच्या किंमती, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्याचबरोबर, यूएस, त्यानंतर यूके आणि युरोपमध्ये महागाईने 40 वर्षांच्या उच्चांकाला स्पर्श केला आहे.


सोन्या-चांदीचे आजचे दर : 


आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्या-चांदीचे फ्युचर्स दर काहीसे कमी झालेले दिसत आहेत. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 47,950 रूपये झाला आहे. दोन दिवसांपूर्वी हा दर 48,210 रूपये होता. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 51,721 रूपये झाला आहे. चांदीचा दरातसुद्धा काहीशी घसरण दिसून येत आहे. आज 1 किलो चांदीचा दर 68,520 रूपये आहे.  


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha